खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून १७ वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे भव्य असे भीमा कृषी व पशु पक्षी प्रदर्शन पाहण्यासाठी शेतकऱ्यांसह लोकांनी मेरी वेदर मैदानावर तुडुंब गर्दी केली होती.तीन दिवसात उच्चांकी तांदूळाची विक्री झाली आहे.आणि बचत गटाच्या स्टॉलच्या माध्यमातून मोठी विक्री झाली आहे. प्रदर्शनाच्या माध्यमातून तीन दिवसात १५ कोटींच्या आसपास उलाढाल झाली आहे. आज रविवारच्या दिवशी खाद्य पदार्थ खाण्यासाठी ताव मारण्यासाठी कोल्हापूरकर यांनी मेरी बेदर मैदानावर गर्दी केली होती.प्रदर्शनाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी रविवार सुट्टी होती त्यामुळे लोकांनी व.कोल्हापूरसह,सांगली,सातारा, सोलापूर, कर्नाटक,इचलकरंजी,बेळगाव व कोल्हापूर जिल्ह्यातील आसपासच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी तुडुंब गर्दी कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी व शेती उपयुक्त साहित्य खरेदीसाठी केली होती.
भागीरथी महिला संस्थेमार्फत सर्व शेतकरी बांधवांसाठी मोफत झुणका भाकर गाव तामगाव भागीरथी महिला बचत गटात मार्फत आजची भाकरी वाटप करण्यात आले.यावेळी मंगल ताई महादेवराव महाडिक, मंगल ताई महाडिक, साधना महाडिक,सौ अरुंधती महाडिक,अंजलीताई मोहिते,आशा जैन, भागीरथी बचत गट महिला सभा सद उपस्थित होते.सायंकाळी गाथा महाराष्ट्राची मराठमोळ्या गाण्यांचा कार्यक्रम झाला.आज प्रदर्शन स्थळी माजी आमदार माधवराव माळी खासदार धनंजय महाडिक यांनी भेट दिली.
कागलमधील हैदर अली बर्ड ब्रिडिंग भीमा अँग्रो फार्म मधील पशू पक्षी याठिकाणी पाहण्यासाठी गर्दी होत आहे.यात ३६५ दिवसात ३०० अंडी देणारी ब्लॅक ऑस्टेलियन कोंबडी,जगातील सर्वात छोटा जापनीज बेंटम कोंबडा, टर्की कोंबडा दीड वर्षाचा बारा किलो वजनाचा आहे.* पांढरे ससे, आफ्रिकन बर्ड सिल्की कोंबड्या, चिनी कोंबडी, सोनाली कोंबडी, गिरीराज कोंबडी, परशियन मांजर ची पिल्ले कबूतर लव बर्ड कोकोटोल बर्ड,अमेरिकन बिल्टम जातीचे बोकड तीन वर्ष आठ महिने आणि चार वर्षाची १८ इंचाचे बोकड, कोलंबियन ब्रम्हा एक वर्षाचा कोंबडा त्याचे साडेचार किलो वजन आहे.गीज बदक,व्हाईट पिक अँन बदक, इंडियन रनर बदक, मस्कवि बदक आकर्षण ठरत आहेत जे पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे.

३६५ दिवसात ३०० अंडी देणारी ब्लॅक ऑस्टेलियन कोंबडी,जगातील सर्वात छोटा जापनीज बेंटम कोंबडा, बारा किलो वजनाचा दीड वर्षाचा टर्की कोंबडा

हरियाणातीलविधायकनावाचारेडा,चायनाझिंगजातीचाबोकडआकर्षणआणिआप्पाचीवाडीयेथीलपाचवर्षाचाशंभूबैल (वळू)साडेपाच वर्षांचे राम आणि रावण नावाचे दोन कंधारी वळू आफ्रिकन बोअर शेळी,मीट मास्टर व ड्रॉपर (मेंढी)सानेन शेळी खास आकर्षण
अर्जंनि येथील सात किलो वजनाची मैलोडी जातीचे कलिंगड, शिवाय रेशीम कोष, शंकरवाडी कागल येथील चार किलोचा मुळा, हेरले येथील पावणे सात किलोचा केळीचा घड, कडेगाव येथील ८६०३२ या वाणाच्या उत्पन्नापेक्षाही ज्यादा उत्पन्न देणारा १३००७ ऊसाची नवीन वाण आकर्षण ठरत आहे. पाच किलोचा चकाट कोबी, अडीच फूट लांब असलेला दिग्विजय नावाचा हरभरा, ऑर्किडची फुले, गडहिंग्लज येथील रेवती जातीची ज्वारी, भडगाव गडहिंग्लज सुभाष पाटील यांचा ऑर्किड पांढरी गुलाबी फुले, पोकचाई प्लेट्यूस कोबी,भडगाव येथील उसातील आंतरपीक घेण्यात आलेला मका कणीस, नरसिंह वाडी ची सेलम नावाची हळद कागल येथील अर्धा किलो वजनाचा कांदा,प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरत आहेत.शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असलेली माहिती भीमा कृषी प्रदर्शनात मिळत आहे. व त्यांना शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य एकाच छताखाली खरेदी करता येत आहेत.
