उद्धव ठाकरे दिल्लीत मोदींची भेट घेणार; मराठा आरक्षणावर होणार चर्चा?

0 4

- Advertisement -

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. आज सकाळी 11 वाजता राजधानी दिल्लीत ही भेट नियोजित आहे.

मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray)मंगळवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेणार आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण (Maratha reservation) उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे हे त्यांच्यासोबत असतील. (Uddhav Thackeray to meet Modi in Delhi; Discussion on Maratha reservation?)

- Advertisement -

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर ते पंतप्रधान मोदींची पहिल्यांदाच प्रत्यक्ष भेट घेत आहेत. त्यामुळे आता या भेटीत काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ही बैठक होईल. कोरोनाशी सामना करत असताना राज्य सरकारला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वेळोवेळी पत्र लिहून अनेक मागण्या करण्यात आल्या होत्या. पण आता खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहे. त्यामुळेही या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे.

काल उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी जवळपास तासभर चर्चा केली. या बैठकीत मराठा, ओबीसी, पदोन्नती आरक्षणासह अन्य महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.