Thursday, April 25, 2024

संसद भवनापेक्षा लसीकरणाला प्राथमिकता द्यावी -आमदार रोहित पवार

- Advertisement -

एकाबाजूला देशभरात कोरोनाचा कहर चालू असताना दुसरीकडे केंद्र सरकारने नव्या संसद भवनाच्या इमारतीचे बांधकाम मात्र सुरू ठेवले आहे. दिल्लीत कडक लॉकडाउन असून कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणावर लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. स्मशानभूमितही मोठ्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत.

असे असतानाही हे काम बंद पडू नये, यासाठी मजुरांचा जीव धोक्यात घालून मजुरांची वाहतूक केली जात आहे. देश आर्थिक अडचणीत असतानाही सुमारे २२ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे काम रात्रंदिवस सुरू आहे. यावर काँग्रेससह विविध पक्षांनी टीकाही केली आहे.

आता यावर आमदार रोहित पवार यांनीही केंद्र सरकारला देशाची प्राथमिकता काय असायला हवी यासाठी एक ट्वीट करून सांगितलं आहे. यामध्ये असे म्हटले आहेत की, “प्रत्येक गोष्टीचं गांभीर्य पाहून त्यानुसार प्राथमिकता ठरवावी लागते. त्यानुसार आज देशाची प्राथमिकता काय आहे याचा पुनर्विचार होणं गरजेचं आहे. कोरोनाचे नवे स्ट्रेन आणि संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर देशातील नागरिकांचं #vaccination करणं ही खऱ्या अर्थाने आजची प्राथमिकता आहे. त्यासाठी राज्य सरकारे अडचणीत असतानाही हजारो कोटी ₹ चा भार उचलून लसीकरणासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र दुसरीकडं केंद्र सरकार लसीकरणाचा भार राज्यांवर लोटून #CentralVista प्रकल्पाचा भार उचलत आहे. आज हे अपेक्षित नाही आणि योग्यही नाही.”

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles