कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे धावणार सुसाट|Vaibhavwadi-Kolhapur rail

कोल्हापूर : येथील कोल्हापूर – वैभववाडी रेल्वे प्रत्यक्ष रुळावर धावनार कधी ? याकडे कोल्हापूर अन् कोकणवासी यांचे लक्ष लागून राहिले आहे. यासाठी खा. धनंजय महाडिक हे सातत्याने आग्रही भूमिका मांडताना दिसत आहेत. Vaibhavwadi-Kolhapur rail

                कोकण रेल्वेचे चेअरमन संजय गुप्ता यांनी गोव्यात बुधवारी झालेल्या बैठकीत या रेल्वेमार्गाला आवश्यक असणाऱ्या बाबींची पूर्तता झाली असून सर्व अडथळे दूर झाल्याचे नमूद केले. तसेच या संदर्भात कोकण रेल्वे आणि मध्यरेल्वेची बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगितले.  यामुळे कोकणातली आंबा थेट घाटावर सोयीस्कर रित्या येईल. तसेच कोल्हापूर दक्षिण भारताशी जोडले जाईल. Vaibhavwadi-Kolhapur rail

     या समितीचे सदस्य राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी विविध प्रश्न उपस्थित करत, आजवरच्या कामाचा आढावा घेतला. तसेच रेल्वे मार्ग लवकरात लवकर व्हावा, अशी  आग्रही मागणीही यावेळी त्यांनी केली. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here