राधानगरी ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूकीत राजर्षी शाहू शहर विकास आघाडीचा ”विजय” नक्की !

राधानगरी : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत निवणुकीची रणधुमाळी सुरू आहे. संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष राधानगरी ग्रामपंचायत निवडणुकीने वेधून घेतले आहे. गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे, विजय बाबा महाडिक यांच्या सोबत भाजप तालुका अध्यक्ष संभाजी आर्डे, राजाराम साखर कारखान्याचे माजी चेअरमन दत्तात्रय निल्ले, माजी संचालक सुधाकर साळुंखे सह महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस गटाचा पाठिंबाही मिळाला आहे. त्यामुळे सत्ताधारी पॅनेलचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. त्यामुळे राजेंद्र भाटळे यांच्या गटात चिंतेचे वातावरण पसरले आहे. विकास कामांसाठी तत्पर असणारा सत्ताधारी गट आणि यास विविध पक्षीय नेत्यांचा पाठिंबा मिळत आहे. सोबत महाडिक परिवाराच्या सक्रिय भूमिकेमुळे राजेंद्र भाटळे गटाचा सत्तास्थापनेचा दावा फोल ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.

केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून विविध शासकीय योजना व निधी आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, त्यामुळे राधानगरीचे सुजाण नागरिक नक्कीच विकासाला मत देतील. अशी प्रतिक्रिया राधानगरीचे युवानेते विजय बाबा महाडिक यांनी लाईव्ह जनमतशी बोलताना दिली. त्यामुळे राधानगरीचे नागरिक आपले बहुमत देऊन कोणाला निवडून देते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here