Weather Alert| वादळी वाऱ्यासह गारपीटसुद्धा होण्याची शक्यता

Live Janmat

महाराष्ट्रात 1 ते 2 मे पर्यंत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गरपीटसुद्धा होऊ शकते. राज्यात दमट वातावरणासह काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील बीड, नंदुरबार आणि साताऱ्यात मेघगर्जना तसेच विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तसेच याच भागात तुरळ ठिकाणी गारपीटसुद्धा होऊ शकते. असा अंदाज मुंबईच्या हवामान खात्यानं वर्तविला आहे.

राज्यात मागील काही दिवसांपासून राज्यात हवामानामध्ये सातत्याने बदल होताना दिसतोय. 30 एप्रिल रोजी राज्यात अनेक ठिकाणी कडक ऊन पडलेले असताना पाऊस बरसला. उन्हाच्या कडाक्यात धुळे शहरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. येथे काही ठिकाणी वादळीवारासुद्धा सुटला होता. नाशिकमध्येसुद्धा विजांच्या कडकडाटासह वादळी वारे सुटले होते. येथील मनमाडसह नांदगाव तालुक्यात हलका पाऊस झाला. या ठिकाणी काही प्रमाणात शेतकऱ्यांनी काढलेल्या कांदा पिकाचे नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले.

आज आणि रविवारी काही ठिकाणी पावसाची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. शेतकऱ्यांनी काढून ठेवलेल्या पिकांना सुरक्षित ठिकणी ठेवावे. तसेच काढणीला आलेल्या पिकांची लवकरात लवकर काढणी करावी असेसुद्धा हवामान विभागाने सांगितले आहे. (maharashtra weather forecast rain)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here