Friday, July 26, 2024

भाजपामध्ये पंतप्रधानपदाचा दुसरा योग्य उमेदवार कोण? देशाचा मूड काय सांगतो?

- Advertisement -

देशात मोदी लाट अजूनही संपलेली नाही. 370 कलम हटवणे असो, राम मंदीर असो असे अनेक लोकांना आवडणारे निर्णय मोदी सरकारने घेतले आहेत. 2014 नंतर झालेल्या निवडणुकांमध्ये, विकास आणि सुशासनाच्या राजकारणाची पाठबळणी करून पंतप्रधान मोदी हे देशाच्या राजकारणातील निर्णायक व्यक्ती बनून राहिले आहेत. 2014 साली भाजपचे सरकार सत्तेत आले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने हे यश मिळवलं. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा करिष्मा असा आहे की, भाजपा एकापाठोपाठ एक निवडणुका जिंकत आहे. 2014 नंतर भाजपाने अनेक विधानसभा निवडणूक आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. आता मूड ऑफ न नेशनच्या ओपनियन पोलने पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा सत्तेवर येतील असा अंदाज वर्तवला आहे. सध्या देशात सर्वत्र मोदींचा चेहरा आहे. पण नरेंद्र मोदींनंतर पुढे कोण चेहरा असेल ? असा प्रश्न आज अनेक लोकांच्या मनात आहे.

दरम्यान मूड ऑफ द नेशनच्या ओपनियन पोलमध्ये हाच प्रश्न सर्वसामान्य लोकांना विचारण्यात आला होता. मूड ऑफ द नेशनमध्ये सर्व लोकसभा मतदारसंघातील एकूण 35,801 लोकांशी बोलून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. 15 डिसेंबर 2023 ते 28 जानेवारी 2024 दरम्यान हा सर्वे करण्यात आला. त्यावेळी 29 टक्के लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर अमित शाह यांना पसंती दिली. तेच मोदींचे उत्तराधिकारी आहेत, असं या लोकांना वाटतं. तर 25 टक्के लोकांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पसंती दर्शवली. आदित्यनाथ मोदी यांचा वारसा पुढे नेऊ शकतात असं या लोकांना वाटतं. दोघेही सध्या देशात महत्त्वाच्या पदावर विराजमान आहेत. सर्वसामान्य लोकांशी निगडीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्याचे अधिकारी दोन्ही नेत्यांकडे आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या नंतर भविष्यात हेच चेहरे असतील का हे पहावे लागेल. पंतप्रधान मोदी हे भारतातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत, परंतु भाजपचे सर्व निवडणुकीमधील सूत्रधार अमित शाह आहेत. त्यांना भाजपचे ‘चाणक्य’ म्हणून संबोधले जाते.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून दुसरा टर्म पूर्ण करणारे योगी आदित्यनाथ याची पक्षात लोकप्रियता वाढली असून कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा मोठा आदर आहे. हिंदुत्व नेते असलेले ते वादग्रस्त असले तरी गुन्हेगारांवर कठोर कारवाई केल्यामुळे आणि भारताच्या सर्वात मोठ्या राज्यात भाजपची घसरलेली बाजू उंचावण्यामुळे लोकप्रिय झाले आहेत.

केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना 16 टक्के लोकांनी पसंती दर्शवली. समस्यासोडवणारा म्हणून ओळखले जाणारे गडकरी यांचे परिवहन मंत्री म्हणून काम आणि देशभरात महामार्गांचे जाळे विस्तारल्याबद्दल विरोधी पक्षांचे नेतेही त्यांचे कौतुक करतात. नितीन गडकरी यांच्याकडे विकासाच व्हिजन असलेला नेता म्हणून पाहिलं जातं. पण सर्वेमध्ये असं दिसून आलय की, जनतेला जास्त कठोर छबी, निर्णय क्षमता असलेला नेता जास्त भावतो.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles