Tuesday, November 12, 2024

हातकणंगले मतदारसंघात राजू शेट्टी यांना कोण देणार आव्हान ?

- Advertisement -

ऊस आंदोलनाच्या मुद्द्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत असणारे नेते म्हणजे राजू शेट्टी. शेतकऱ्यांच्या हितासाठी ऊस आणि दुधाला चांगले दर मिळावे यासाठी कायम शेतकऱ्यांच्या बाजूने लढताना दिसतात. त्यांनी २००४ साली स्वाभिमानी पक्षाची स्थापना केला. | Hatkanangle loksabha

राजू शेट्टी यांनी राजकीय सुरुवात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतून केली. यानंतर २००४ च्या शिरोळ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये राजू शेट्टी यांनी अपक्ष राहून कॉंग्रेसच्या रजनीताई मगदूम यांचा १८७४७ मतांनी पराभव केला. पुढे २००४ मध्ये स्थापन झालेला स्वाभिमानी पक्ष हा २००९ च्या हातकणंगले लोकसभा निवडणुकीमध्ये उतरला. आपल्या पहिल्याच लोकसभा निवडणुकीमध्ये स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीच्या निवेदिता माने यांचा ९५०६० मतांनी पराभव केला. यानंतर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून कलाप्पा बाबुराव आवाडे उभे होते. पुन्हा स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी यांनी १७७८१० मतांनी पराभव केला. अशा प्रकारे सलग दोन वेळा राजू शेट्टी हे हातकणंगले लोकसभा Hatkanangle loksabha मतदारसंघाचे खासदार राहिले. २०१९ साली झालेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे धैर्यशील माने यांनी स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी यांचा ९६०३९ मतफरकाने पराभव केला. यावेळी वंचित बहुजन आघाडीकडून असणारे अस्लम सय्यद यांना १२३४१९ येवढी मते पडल्याने याचा परिणाम राजू शेट्टी यांच्यावर झालेला दिसून येतो.

Kolhapur LokSabha| २०२४ ची निवडणूक प्रतिष्ठेची;उमेदवारीवरून रस्सीखेच

 ….म्हणून शेट्टी यांची हॅट्रिक हुकली | Hatkanangle loksabha

२०१४ ला देशात मोदी लाट होती. त्यामुळे सत्तांतर अटळ होत. याचाच परिणाम म्हणून राजू शेट्टी यांनी भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्याची दुसरी टर्म होती. तेंव्हा सदाभाऊ खोत ही त्यांच्यासोबत होते. तेंव्हा स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी हे १७७८१० मतांनी पुन्हा निवडून आले. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेससह कॉँग्रेस सरकारवर जोरदार टीका केल्या होत्या. कालांतराने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय भाजप घेत नाही असा आरोप करून शेट्टी यांनी युतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

२०१९ ला मात्र या मतदारसंघाच थोडस चित्र वेगळ होत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधील अनेक नेते नाराज होते. काहीजण संघटना सोडूनही गेले. पण शेट्टी यांनी परत एकदा सर्वांची नव्याने मूठ बांधून लोकसभेची तयारी चालू केली. २०१९ ला मोदी लाट होतीच, शिवाय तेंव्हा शिवसेना आणि भाजप एकत्र लढत होते. २०१९ ला शेट्टी यांचा विजय निश्चित होता असच सर्वाना वाटत होत. त्यांच्या विरुद्ध शिवसेनेकडून धैर्यशील माने हे उभे होते. तरुण चेहरा आणि प्रभावी भाषण शैली यामुळे २०१९ च्या निवडणुकीत चुरस वाढली होती. सोशल मेडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर झाला. ज्यांच्यावर २०१४ ला शेतकऱ्यांचे वाटोळे केले असा आरोप केला त्यांच्याच सोबत २०१९ ला शेट्टी गेले. त्यामुळे लोकांची द्विधा मनस्थिति झाली. याचा फायदा माने यांनी घेतला. तर दुसरीकडे जातिवाचक मोठा फटका राजू शेट्टी यांना बसला. त्यामुळे सर्वांना धक्का बसेल असाच निकाल लागला. तब्बल ९६०३९ मतांनी राजू शेट्टी यांचा पराभव झाला. त्यामुळे त्यांची हॅट्रिक हुकली.

मतदार संघात विद्यमान खासदार सक्रिय नसल्याचा शेट्टी यांना फायदा होणार का?

राष्ट्रवादीत असलेल्या धैर्यशील मानेंनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केला आणि निवडून आले. त्यावेळी त्यांना भाजपचे नेते चंद्रकांतदादा पाटील यांनी मदत केली. त्यामुळे त्यांचा विजय सुकर झाला. पण खासदार झाल्यावर मात्र गेली चार वर्षात धैर्यशील माने यांचा या मतदारसंघात जनसंपर्क नसल्यामुळे लोकांच्यामध्ये नाराजी असल्याचे दिसून येते. मतदारसंघात काही ठिकाणी खासदार हरवला आहे असे फलक करून लावलेले होते. ठाकरे गटातून बाहेर पडून सध्या ते एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात अनेक शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. याचा फार मोठा परिणाम धैर्यशील माने यांच्यावर होवू शकतो. या नाराजीचा फायदा राजू शेट्टी नक्कीच घेतील. काही दिवसपूर्वी त्यांनी उद्धव ठाकरे यांचीही भेत घेतली होती.राजू शेट्टी आणि त्यांचा मुलगा सौरभ शेट्टी यांनी मतदारसंघात अनेक दौरे केलेले आहेत. ऊस आंदोलन मुद्दयासाठी संपूर्ण महराष्ट्रात राजू शेट्टी चर्चेत आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी ऊस आणि दुधाला चांगले दर मिळावे यासाठी सतत प्रयत्नशील दिसतात. येणाऱ्या आगामी निवडणुकीत राजू शेट्टी यांना याचा फायदा होणार का हे चित्र पहावयास मिळणार आहे.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची आगामी निवडणुकीत राजू शेट्टी यांच्या विरोधात एकही तगडा उमेदवार नसल्याने कोण निवडणूक लढवणार कोणत्या मुद्यावर लढवणार असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून उमेदार कोण अशी चर्चा सुरु आहे. अद्याप अजून स्पष्ट झाले नाही कोणता उमेदवार असेल व कोणत्या पक्षाकडून लढणार आहे. राजू शेट्टी यांनी सध्या स्वतंत्रच लढण्याची भूमिका घेतली आहे.

Hatkanangle loksabha महायुतीकडून नवीन उमेदवाराची चाचपणी

सध्या विद्यामन खासदार धैर्यशील माने हे एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत. देशात मोदींना पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा संधी द्यायची आहे अस भाजपने ठरवल आहे. त्यासाठी गेली वर्षभरापासून भाजपच्या नेत्यानी कंबर कसली आहे. अनेक जेष्ठ नेते या मतदारसंघात येवून आढावा बैठक घेत आहेत. या मतदार संघात युतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी, योग्य आणि लोकांना आवडणारा उमेदवार देण्यासाठी शिंदे गट, अजित पवार गट आणि भारतीय जनता पार्टी या तिघांनीही या मतदार संघातून सर्वे घेणे चालू केल आहे. या सर्वे वरून राजू शेट्टी यांच्या विरुद्ध कोणाला उतरविणार हे ठरेल.

महायुतीतून संभाव्य उमेदवार कोण असतील

दुसऱ्यांदा खासदार म्हणून धैर्यशील माने यांना संधि हवी आहे. यासाठी त्यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडीत त्यांनी सुरुवातीला ठाकरे गटात राहण्याचा विचार केला पण भविष्याचा विचार करून लगेच त्यांनी शिंदे गटात जाणे पसंत केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचे ते चांगले मित्र आहेत. शिंदे गटात जाताना त्यांनी उमेदवारीचा शब्द घेऊनच तो निर्णय घेतला होता अस जाणकरांचे मत आहे. सध्या उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांनी धावळप चालू आहे.

तर दुसरीकडे या मतदार संघात सत्ता गाजवणारे आवडे कुटुंबाला भाजपने सोबत घेतले आहे. अनेक वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या घरी जावून भेट दिलेली आहे. भाजपच्या अनेक कार्यक्रमामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. कर्नाटक निवडणुकीतही त्यांना प्रचार यंत्रणेची जबाबदारी देण्यात आली होती. शाळा, कॉलेज, कारखाने, बँक, उद्योगधंदे यांच्या माध्यमातून लाखों लोकांना त्यांनी एकत्र ठेवले आहे. त्यामुळे जर नवीन चेहरा द्यायचा झाला तर युतीकडे आवडे कुटुंबातील व्यक्ती असू शकेल अस म्हंटल जात. तर जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतीक पाटील, यांचेही नाव चर्चेत आहे.

ते महायुतीचा एक भाग आहेत. राजू शेट्टी यांनी महायुती व महाविकास आघाडी या कोणाचाही भाग होणार नाही असे स्पष्ट केले आहे. जर राजू शेट्टी हे महाविकास आघाडीत गेले नाही तर महाविकास आघाडी आपला उमेदवार या लोकसभा मतदारसंघात उभा करू शकते. असे झाल्यास या मतदारसंघात ही लढत तिरंगी होऊ शकते व राजकारणात मोठा फेरफलट होऊ शकतो.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles