Thursday, November 14, 2024

भोसरी विधानसभेत महेश लांडगेंची हॅट्रीक कोण रोखणार?

- Advertisement -

राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. येणाऱ्या काही दिवसात राज्यात निवडणुकीची आचारसहिंता लागू शकते. अद्याप अजूनही महाविकास आणि महायुतीच्या जागा वाटप निश्चित झाल्या नाहीत. पुणे जिल्ह्यातील भोसरी विधानसभा मतदारसंघाचा हा गुंतागुंतीचा आहे.

भोसरी मतदारसंघ हा शिवसेनेकडे 2009 आणि 2014 मध्ये होता. 2019 मध्ये मात्र, हा मतदारसंघ भाजपकडे गेला. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांनी भोसरीवर दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे (Ajit Gavhane) यांनी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला आहे, ज्यामुळे भोसरी मतदारसंघातील राजकारण अधिकच चुरशीचे झाले आहे. रवी लांडगे (Ravi Landage) यांना कौटुंबिक राजकीय वारसा लाभला असून, त्यामुळे त्यांचा मतदारसंघात मोठा जनसंपर्क आहे. महाविकास आघाडी सरकार असताना रवी लांडगे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात होते. तथापि, अजित पवार (Ajit Pawar)भाजप सोबत गेल्याने रवी लांडगे यांची अडचण वाढली. अखेर त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आणि आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे.

भोसरी विधानसभा २०१९ निकाल :

उमेदवाराचे नावपक्षमतेटक्केवारी
महेश (दादा) लांडगेभाजप१,५९,२९५६०.४६ %
विठोबा लांडेअपक्ष८१,७२८३१.०२%

भोसरी विधानसभा मतदारसंघात सध्या राजकीय वातावरण तापले आहे. विद्यमान आमदार महेश लांडगे (Mahesh Landage) यांनी आपला जनसंपर्क वाढवला असला तरी त्यांच्या विरोधात राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. महेश लांडगे (Mahesh Landage) यांचे भाऊ रवी लांडगे (Ravi Landage) यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला असून, आगामी निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. याशिवाय, अजित पवार (Ajit Pawar) यांचे एकेकाळचे सहकारी अजित गव्हाणे यांनी शरद पवार गटात जाऊन तुतारी हातात घेऊन निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. धनंजय आल्हाट (Dhananjay Aalhat) आणि सुलभा उबाळे (Sulbha Ubale) देखील या मतदारसंघात इच्छुक आहेत, त्यामुळे कोण बाजी मारणार याकडे पुणेकरांचे लक्ष लागून आहे.

महाविकास आघाडीच्या शरदचंद्र पवार गटाकडून अजित गव्हाणे आणि ठाकरे गटाकडून रवी लांडगे हे उमेदवारी मिळवण्यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे भोसरीच्या जागेवरून महाविकास आघाडीत तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. विद्यमान आमदार महेश लांडगे पुन्हा भाजपमधून उमेदवारीसाठी इच्छुक असल्यामुळे भोसरी विधानसभा निवडणुकीत मोठा संघर्ष रंगणार आहे. येणाऱ्या आगामी काळात भोसरी विधानसभा मतदारसंघात कोणाचे वर्चस्व असेल हे पहावं लागेल.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles