Wednesday, November 20, 2024

मुंबईसह राज्यात अधिकाधिक स्टार्टअप सुरू होण्यासाठी सर्वंकष धोरणाची निर्मिती करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

- Advertisement -

मुंबई दि. 7 : नवउद्योजकांनी धोरण निर्मितीत योगदान द्यावे, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी शासन सहाय्य करेल. मुंबईसह राज्यात अधिकाधिक स्टार्टअप (startups) सुरू होण्यासाठी सर्वंकष धोरणाची निर्मिती करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी टेक आंत्रप्रनर्स असोसिएशन ऑफ मुंबई (टीम) समवेत आज  सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक घेऊन विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाबाबत चर्चा केली. महाराष्ट्रातील 25 पैकी 10 हून अधिक युनिकॉर्नस् या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीस टेक आंत्रप्रनर्स असोसिएशन ऑफ मुंबई चे सदस्य, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी आणि विशेष कार्यकारी अधिकारी कौस्तुभ धवसे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस  म्हणाले, देशातील अन्य शहराच्या तुलनेत मुंबईत नव उद्योजकांसाठी अधिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह महाराष्ट्रात विविध कंपन्या गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक आहेत. महाराष्ट्र राज्य उद्योग स्नेही राज्य असून  राज्यात नवीन उद्योगांकरीता उद्योगस्नेही धोरण आणले जाईल.

राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी पायाभूत प्रकल्पांना गती देण्यात येत आहे. येत्या दोन वर्षात बुलेट ट्रेन, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड,  कोस्टल रोड, मेट्रो प्रकल्प यामुळे मुंबईचा कायापालट होणार आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेला उद्योग क्षेत्राच्या विकासामुळे गती मिळते महाराष्ट्र राज्य आता स्टार्ट अप्स (startups) व युनिकॉर्नची राजधानी बनत आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles