रोहित दादा प्रत्येक प्रश्नावर फक्त ट्विट करून भागेल का? -स्पर्धा परीक्षा समन्वय समिती

0 7

- Advertisement -

सरकारी विभागातील कंत्राटी नोकऱ्या देण्यासाठी खाजगी कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. त्याविरोधात स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने आवाज उठवला आहे. तलाठी भरती मध्येही मोठ्या प्रमाणात पेपर फोडून भ्रष्टाचार केल्याचे पुरावे समितीने सादर केले होते. काही दिवासापूर्वी पुण्यामध्ये कंत्राटीभरती विरोधात स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने आंदोलन केले.

आमदार रोहित पवार यांनी फीसंदर्भात अधिवेशन गाजवल होत. ट्विटर च्या माध्यमातून तरुणांचे प्रश्न व्यक्त करत होते. पण यातून तरुणांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने रोहित पवार यांच्या एक ट्विटला रिपले देताना म्हंटले की “रोहित दादा प्रत्येक प्रश्नावर फक्त ट्विट करून भागेल का? युवकांच्या गंभीर मुद्यावर किती दिवस आपण फक्त ट्विट-ट्विट खेळणार आहात? कंत्राटी नोकर भरती, पेपरफुटी अशा युवकांच्या कळीच्या मुद्यावर आपल्याकडून ऑन ग्राउंड काहीतरी करण्याची अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण आंदोलनात कधी उतरणार?”

यावर रोहित पवार म्हणाले, #कंत्राटी भरती, #पेपरफुटी, #परीक्षा_फी हे विषय अतिशय गंभीर असतानाही सरकार मात्र दुर्लक्ष करत आहे. युवा वर्गाला गृहीत धरणाऱ्या या मस्तवाल सरकारला आपण सर्व रस्त्यावर उतरल्याशिवाय जाग येणार नाही. तुमचा भाऊ आणि मित्र म्हणून हे विषय सोडवण्यासाठी मी सदैव तुमच्यासोबत आहे. तुम्ही सांगा #आंदोलन केंव्हा आणि कुठे करायचे? मी येईल तुमच्यासोबत!

- Advertisement -

कंत्राटी पदभरतीमुळे पुन्हा कंपनीराज सुरू होण्याची भीती आहे, कमी पगारात गरिबांना राबविण्याची ही नवी पद्धत असेल. त्यामुळे कंत्राटी भरतीचा निर्णय मागे घ्यावा. नोकरभरती मधील घोटाळ्यांमुळे बेरोजगार नैराश्यात आहेत, भ्रष्ट तलाठी भरती सरकारने तत्काळ स्थगित करावी.

राहुल कवठेकर, अध्यक्ष स्पर्धा परीक्षा समन्वय समिती

स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील महापरीक्षा पोर्टल, टीईटी घोटाळा, आरोग्य भरती पेपरफुटी, म्हाडा नोकरभरती पेपरफुटी, मुंबई पोलीस भरती पेपरफुटी आदी नोकर भरती घोटाळे उघड केले आहेत. यासाठी पेपरफुटीवर कडक कायदा करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.