Wednesday, November 20, 2024

महाराष्ट्राच्या राजकारणात तिसरा मोठा राजकीय भूकंप होणार? |Girish Mahajan

- Advertisement -

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. मार्च-एप्रिल मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाच्या गोटात जोरदार हालचाली घडत आहेत. एकीकडे देशभरातील विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजप विरोधात इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीतही जागावाटपासाठी बैठका सुरु आहेत. दुसरीकडे सत्ताधारी पक्षांच्या गोटातही जोरदार हालाचाली घडत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने गेली अनेक महिन्यापासून तयारी सुरू केली आहे. Girish Mahajan

असं असताना आता भाजपचे बडे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan ) यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत मोठं वक्तव्य केल आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पुढच्या 15 ते 20 दिवसांमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे. मागील सहा महिन्यांपूर्वी राज्यात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरी झाली होती. लोकसभा निवडणुकांच्या सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. याचवेळी राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानात दुसरीकडे पडद्यामागच्या घडामोडींनी वेग पकडला आहे. गेल्या दीड वर्षात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमध्ये फूट पडली आहे. या पक्षांनंतर आता महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षात फूट पडेल, अशी भाकीतं सातत्याने वर्तवण्यात आली आहे. विशेष म्हणजे काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वातील एक मोठा गट काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपात येईल, अशा चर्चा सातत्याने होत असतात. पण अशोक चव्हाण यांनी या विषयीचे सातत्याने खंडन केलं आहे. असं असताना आता गिरीश महाजन यांनी येत्या 15 ते 20 दिवसात महाराष्ट्रात तिसरा राजकीय भूकंप घडेल, असे संकेत दिले आहेत.

sambhaji raje | संभाजीराजेंकडून लोकसभा निवडणुक लढविण्याचे संकेत

भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन | Girish Mahajan

गिरीश महाजन हे भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक आहेत. भाजपचे संकटमोचक नेते म्हणून त्यांना ओळखले जाते. याशिवाय ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय जवळचे आणि विश्वासू नेते असल्याचं मानलं जातं. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला महत्त्व आहे. राज्यात आगामी काळात अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडणार आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर येत्या 10 जानेवारीला शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणाचा निकाल जाहीर करणार आहेत. हा निकाल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा झटका बसणार आहे. तसा निकाल लागला तर एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्यासह त्यांच्या गटाचे 16 आमदार अपात्र ठरतील. तसेच हे शिंदे सरकारही कोसळू शकतं. पण निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला तर सध्याचं सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल. आमदार अपात्रतेच्या प्रकरणाआधी गिरीश महाजन यांनी हे वक्तव्य केल्याने त्यांच्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झालं आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटीनंतर नंबर कुणाचा?

राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत मोठं विधान केले.महाराष्ट्राच्या राजकारणात पुढच्या 15 ते 20 दिवसांमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा केला आहे.ते म्हणाले, “बघा,निवडणुकीच्या आधीच होईल.आपल्याला कळेल कुठल्या पक्षात काय-काय घडतंय. पण निश्चित निवडणुकीच्या तोंडावर पुढच्या 15 ते 20 दिवसांत मोठे भूकंप झालेले बघायला मिळतील”, असं महाजन म्हणाले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर आता पुढचा नंबर काँग्रेसचा असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून बोलले जात आहे. त्यात काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांभोवती संशयाचं दाट धुकं आहे.त्याच पार्श्वभूमीवर मोदी-शाह जोडी लोकसभेआधी महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठा डाव टाकण्याची शक्यता आहे.त्यात लवकरच विधानसभा अध्यक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेचा निर्णय देण्याची शक्यता आहे.याच धर्तीवर मंत्री गिरीश महाजनांनी |Girish Mahajan केलेल्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles