ZP exam |परीक्षा फॉर्म भरून तब्बल 1374 दिवस पूर्ण पण परीक्षा नाहीच

- Advertisement -

जिल्हा परिषद ZP exam अंतर्गत गट क वर्गाची नोकर भरती करण्यास राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे एकूण रिक्त जागांच्या 80 टक्के जागा भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.वाहन चालक आणि गट ड वर्गातील पदे वगळून इतर पदे भरण्यास आज राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. पण सरकार फक्त जीआर काढून वेळ ढकळून नेण्याच काम करत आहे असा आरोप विद्यार्थी करत आहे.

धक्कादायक ! पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या आळ्या | savitribai phule pune university

mpsc आयोगाला एवढी घाई का? परीक्षेतील बदलावर विद्यार्थ्यांनी केल्या शंका उपस्थित | mpsc syllabus 

talathi bharti 2022 | तलाठी परीक्षेसाठीचा नवीन अभ्यासक्रम जाणून घ्या

गट क वर्गासाठी होणारी ही पदभरती जिल्हा निवड मंडळ आणि जिल्हा परिषद अंतर्गत होणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यात 75 हजार नोकर भरती करण्यात येत असून यात ग्रामविकास विभागाची ही नोकर भरती महत्त्वाची मानली जाते. ZP exam

“साहेब 2019 ला आम्ही जिल्हापरिषद ZP exam भरतीसाठी फॉर्म भरले होते आज 2023 उजाडले आहे. फॉर्म भरून 1374 दिवस पूर्ण झाले आहेत अजून आम्हाला परीक्षा देता येत नाहीये.आपल्या सरकारला येवढे दिवस होऊन जर एक परीक्षा घेता येत नसेल तर आपण महाराष्ट्र कसा काय सांभाळताय असा प्रश्न पडतो.” असा सवाल स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला आहे.

ज्या विभागांचा किंवा कार्यालयांचा सुधारित आकृतीबंध अंतिम झालेला आहे, अशा विभागातील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदे 100 टक्के भरण्यास मुभा देण्यात यत आहे. ज्या विभागांचा सुधारित आकृतीबंध अद्याप अंतिम झालेला नाही, अशा विभागातील गट अ, गट ब व गट क मधील (वाहनचालक आणि गट ड संवर्गातील पदे वगळून) सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या 80 टक्के मर्यादेपर्यंत रिक्त पदे भरम्यास मुभा देण्यात येत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles