Wednesday, November 20, 2024

चिंचवड विधानसभेत मोठी उलतापालथ होणार ?

- Advertisement -

Chinchwad Assembly election 2024: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पुण्यातील चिंचवड विधानसभा मतदारसंघ महायुतीमध्ये उमेदवारीसाठी जोरदार चुरस सुरु झाली आहे. हा मतदार लोकसंख्येच्या दृष्टीने पुणे जिल्ह्यात सगळ्यात मोठा आहे. २००९ साली या मतदारसंघाची पहिली निवडणूक झाली. हा मतदारसंघ जगताप कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो कारण लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) हे २००९,२०१४,२०१९ तीन वेळेस आमदार होते. त्यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) या सहानुभूतीच्या लाटेवर निवडून आल्या होत्या. या मतदारसंघाचा विचार केला तर आतापर्यंत भाजपचे वर्चस्व असल्याचे दिसून येते.

चिंचवड विधानसभेत उमेदवारीसाठी महायुतीमध्ये चुरस वाढली

चिंचवड विधानसभेची निवडणूक ही महायुतीसाठी आव्हानात्मक ठरणार आहे कारण या मतदारसंघासाठी विद्यमान आमदार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) या इच्छुक आहेत. तसेच भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप (Shankar Jagtap) हे देखील निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. भाजपमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच चालू असताना अजित पवार गटाचे नाना काटे यांनी आपला डाव टाकत हा मतदारसंघ अजित पवार (Ajit Pawar) गटाला मिळावा अशी मागणी केली आहे. या अगोदर नाना काटे यांनी २०१४ आणि नुकत्याच झालेल्या पोटनिवडणूक लढवून चांगले मताधिक्य घेतले होते. चिंचवड विधानसभा हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे महायुतीमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी झालेली आहे.

भाजपला हि जागा सुटली तर नाना काटे (Nana Kate) हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात जातील अशी शक्याता वर्तवली जाते. तसेच भाजपला हि जागा सुटली आणि विद्यमान आमदार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांना उमेदवारी मिळाली नाही तर त्या देखील अपक्ष किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचे संकेत या मतदारसंघात दिसून येत आहे. भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून अश्विनी जगताप यांनाच उमेदवारी मिळावी असा आग्रह आहे.

आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप (Shankar Jagtap) हे निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. शत्रुघ्न काटे (Shatrughan Kate) हे देखील भाजपच्या चिन्हावरून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत त्यामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघात महायुतीचा पेच वाढला आहे. येणाऱ्या आगामी काळात चिंचवड विधानसभेत या इच्छुक उमेदवारांना तिकीट मिळाले नाही तर या ठिकाणी बंडखोरी होण्याची दाट शक्यता आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles