निवडणुकीच्या अगोदर हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांच्यात जुगलबंदी |

कोल्हापूरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे अत्यंत जवळचे शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे (Samarjeetsinh Ghatge) यांनी कागलमध्ये शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटात मंगळवारी दि.३ सप्टेंबर रोजी पक्षप्रवेश केला आहे.

यावेळी शरद पवार,जयंत पाटील,उत्तम जाणकार आणि समरजितसिंह घाटगे (Samarjeetsinh Ghatge) या सर्वांनी हसन मुश्रीफ (Hasan mushrif) यांच्यावर जोरदार हल्ला केला. याला उत्तर देताना हसन मुश्रीफ पुढील गोष्टी बोलल्या माझ्यासारख्या अल्पसंख्याकांच्या मागे का लागलात? हसन मुश्रीफ (Hasan mushrif) यांनी जातीवाचक आरोप केले आहेत. मुश्रीफ यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या समरजितसिंह घाटगे यांनी जोरदार पलटवार केला आहे. ज्या व्यक्तीने तुम्हाला सर्व पदे दिली तेव्हा त्यांना अल्पसंख्यांक म्हणून विषय नव्हता का? अशी विचारणा समरजित यांनी मांडली.  

महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही: समरजित घाटगे

(Hasan Mushrif on Samarjeet Ghatge) समरजित घाटगे यांनी मुश्रीफांवर चांगलाच हल्लाबोल केला. समरजित म्हणाले की, ते तुमच्या वडिलांच्या वयाचे आहेत. त्यांचा आदर करा, त्यांच्यावर कुणीही असले आरोप करायचे धाडस करत नाही, ते तुम्ही केले आहेत. महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही. पुरोगामी विचाराची चळवळ तुम्हाला माफ करणार नाही. समरजित घाटगे यांना काय बोलायचं ते बोला, पण तुम्ही जाहीर माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली. असे खडेबोल समरजित घाटगे यांनी मुश्रीफांना सुनावले.

समरजित घाटगे यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी बोलले होते की घाटगे यांना महत्त्व देण्याचा संबंध नाही. आता त्यांची अशी वक्तव्ये येत आहेत की मला त्यांची काळजी करण्याची गरज नाही. कागलची स्वाभिमानी जनता आहे, ती माझी पाठराखण करणार आहे. माझ्या मागे शरद पवार यांचा आशीर्वाद आहे, त्यामुळे मला कोणत्या गोष्टीची काळजी करण्याची आता गरज नाही.  अशा बऱ्याच धमक्या त्यांनी मला आधी दिल्या आहेत. मी त्यांच्या गोष्टींना फारसे मनावर घेत नसल्याचे ते समरजित घाटगे म्हणाले. 

शरद पवार साहबसे मेरा बैर नही समरजित अब तुम्हारी खैर नही: हसन मुश्रीफ

शरद पवार यांच्याशी माझे वैर नाही, परंतु समरजित यांची आता खैर नाही असा इशारा हसन मुश्रीफ यांनी दिला. येणारी आगामी विधानसभा निवडणूक ही नायक विरुद्ध खलनायक असल्याची टीकाही केली.

मुंबईमध्ये हसन मुश्रीफ माध्यमांशी बोलताना, त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले कागलमध्ये तिरंगी लढतींमुळे  तुमचा विजय सोपा होत होता, या प्रश्नावर उत्तर म्हणून हसन मुश्रीफ म्हणाले, मी एकूण सहा विधानसभा निवडणुका लढलो त्यापैकी एकास एक अशा लढती तीन वेळा झालेल्या आहेत तिरंगी लढत एकवेळच झाली आहे. पुढे बोलताना ते म्हणाले ही निवडणूक म्हणजे नायक विरुद्ध खलनायक अशी लढत आहे.

vishal  के बारे में
vishal The live janmat is a Marathi digital News web portal. We aim to report the latest news, views, and entertainment. We seek to look at policies and decision-making from the perspective of people. Read More
For Feedback - livejanmt@gmail.com