- Advertisement -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचा निर्णय.
सध्या कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने तसेच विद्यापीठ कार्यक्षेत्रामध्ये लागू करण्यात आलेल्या संचार बंदी व इतर निर्बंध विचारात घेता ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेणे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उचित होणार नाही. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ मार्फत घेण्यात येणाऱ्या हिवाळी सत्र 2020 करिता यापूर्वी ऑफलाईन पद्धतीचा परीक्षेचा पर्याय निवडलेला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने परीक्षा देण्यासाठी युनिव्हर्सिटीच्या वेबसाइटवर लिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.