MAHARASHTRA CORONA update| राज्यात विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून शनिवार आणि रविवारी संपूर्ण राज्यात कडकडीत बंद राहणार असल्याची माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
मागील काही दिवसांत करोनानं अक्षरक्षः थैमान घातल्यानं राज्य सरकारची झोप उडाली आहे. प्रचंड वेगानं होत असलेल्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य सेवेवर ताण येण्यास सुरूवात झाली असून, रुग्णांचे हाल टाळण्यासाठी आणि विषाणू संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारकडून लॉकडाउन संदर्भात चाचपणी सुरू होती. सर्वच क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज लॉकडाउन/ कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीची बैठक बोलावून लॉकडाऊनबाबत चर्चा केली. त्यात राज्यात विकेंड लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीनंतर नवाब मलिक यांनी याबाबतची माहिती दिली. राज्यात शुक्रवारी रात्री 8 वाजल्यापासून लॉकडाऊन सुरू होईल. तो सोमवारी सकाळी संपले. दर आठवड्याला शनिवार आणि रविवारी राज्यात कडकडीत बंद राहणार आहे. फक्त यातून अत्यावश्यक सेवा वगळण्या आल्या आहेत.
INSTAGRAM वर आम्हाला फॉलो
असा असेल लॉकडाऊन
राज्यात उद्यापासून कडक नियम लागू होणार असून, रात्री ८ वाजेपासून सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी असणार असून, दिवसा १४४ कलम लागू (जमावबंदी) असेल, असं मलिक यांनी सांगितलं.
उद्या रात्री 8 वाजेपासून नियमावली लागू
रात्री 8 ते सकाळी ७ पर्यंत रात्रीची संचारबंदी
मॉल, बार, रेस्टॉरंट बंद करण्याचा निर्णय, डिलिव्हरी सर्व्हिस चालू
सरकारी कार्यालय 50 टक्के क्षमतेनं काम करणार
इंडस्ट्री चालू राहणार, कामगारांवर कुठलेही निर्बंध नाही
बांधकाम चालू, सरकारी ठेके असलेली कामं सुरु राहणार
भाजी मार्केटवर कुठल्याही प्रकारचे निर्बंध नाहीत. फक्त गर्दी कमी करण्यासाठी कठोर निर्णय
शुटिंगवर गर्दी होणार नाही तिथे परवानगी, चित्रपटगृहे बंद राहणार
सर्व ट्रान्सपोर्ट व्यवस्था सुरु राहणार, मास्क बंधनकारक, क्षमतेपेक्षा 50 टक्क्याने सर्व सार्वजनिक वाहतूक सुरु राहणार
राज्यात विकेंड लॉकडाऊनच्या काळात राज्यात गार्डन, चौपाट्या, धार्मिक स्थळे बंद राहतील. तसेच सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमही बंद राहणार आहेत. फक्त पुजाऱ्यांना मंदिरात पूजा करण्यासाठी मुभा देण्यात आल्याचं मलिक यांनी सांगितलं.
उद्धव ठाकरे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना फोन करून राज्यात लॉकडाऊन लागल्यास सहकार्य करा, असं आवाहन केलं आहे.
मनसेच्या अधिकृत ट्वीट हँडलवर म्हटलं आहे की, “राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो,त्यामुळे अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहकार्य करावं,असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना फोनवरील संवादात केलं आहे.”