कोल्हापूर जिल्ह्यामध्ये निदर्शनात येत आहे की, अनेक रुग्णालय covid-19 रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून रेमडेसिवीर इंजेक्शन आणण्याबाबत सक्ती करत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील हेल्पलाइन क्रमांकावर याबाबत नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झालेले आहेत.
रुग्णालयांच्या नातेवाईकांना बाहेरून रेमडेसिवीर इंजेक्शन आणण्यास सांगत आहेत. रेमडेसिवीर इंजेक्शनच्या उपलब्धतेच्या चौकशीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या नातेवाईकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. आणि यामुळे कोरोना चा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता निर्माण होत आहे.
ताज्या बातम्यांसाठी Email Subscribe करा
covid19 च्या लॉकडाऊन च्या काळात नातेवाईकांना अशा प्रकारे विविध ठिकाणी जायला सांगून त्यांना व इतरांना संसर्गाचा धोका निर्माण होत आहे.
या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, कोल्हापूर जिल्हाधिकार्यांनी आदेश काढले आहेत. कोल्हापूर जिल्ह्याला शासन\पुरवठाधारक एजन्सीकडून प्राप्त होत असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचे वाटप त्या त्या रूग्णालयाच्या क्षमतेनुसार व मागणीनुसार दैनंदिन उपलब्ध साठ्यातून करण्यात येते. ज्या रुग्णालयांमध्ये covid-19 चा रुग्ण उपचार घेत आहे. त्या रुग्णालयांनी स्वतः त्या रुग्णास रेमडेसिवीर इंजेक्शन व इतर औषधे उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.