“प्रत्येक गोष्टीचं गांभीर्य पाहून त्यानुसार प्राथमिकता ठरवावी लागते. त्यानुसार आज देशाची प्राथमिकता काय आहे याचा पुनर्विचार होणं गरजेचं आहे.” असे ट्विट राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी काल करून केंद्राच्या धोरणांवर बोट ठेवलेलं.
याला प्रतिउत्तर म्हणून भाजपचे आमदार अतुल भातखळकर (MLA Atul Bhatkhalkar) यांनी थेट रोहित पवारांवर पलटवार केला आहे. “केवळ पवार आडनाव एवढंच आपलं कर्तृत्व आहे, हे पंतप्रधानांवर टीका करण्यापूर्वी लक्षात ठेवलेत तर बरं होईल.”
नव्या संसद भवनाच्या इमारतीचे बांधकामावरून (new parliament building ) #CentralVista रोहित पवारांनी ट्विट केलेलं. पण आता याला अतुल भातखळकर (MLA Atul Bhatkhalkar) यांनी उत्तर दिल आहे. ते म्हणाले मुख्यमंत्री ४०० कोटी रुपये खर्चून वडिलांचे स्मारक उभरताय, त्यांना हा प्रश्न विचारा रोहित जी. एवढ्यावरच न थांबता पुढे त्यांनी म्हटले की, आपल्या गृहमंत्र्याने फ़क्त मुंबईतून केलेली वसूली दीड हजार कोटी आहे म्हणतात, ती रक्कम लसीकरणासाठी वळवा…
- तुमच्या भावाला पुन्हा विधानसभेत पाठवा : वैशाली क्षीरसागर यांचे महिलांना भावनिक साद
- उत्तरची जनता महायुतीच्या बाजूने; राजेश क्षीरसागर यांचा विजय निश्चित : आदिल फरास
- सिद्धार्थनगरशी माझं नातं अतूट : राजेश क्षीरसागर
- राजेश क्षीरसागर यांचा कार्यअहवाल सर्वांगीण कामाचे उत्तम प्रगतीपुस्तक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- कोल्हापूर उत्तरमुळे जिल्ह्यातील आघाडीच्या दहाही जागा येणार नाही;धनंजय महाडिक