“प्रत्येक गोष्टीचं गांभीर्य पाहून त्यानुसार प्राथमिकता ठरवावी लागते. त्यानुसार आज देशाची प्राथमिकता काय आहे याचा पुनर्विचार होणं गरजेचं आहे.” असे ट्विट राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी काल करून केंद्राच्या धोरणांवर बोट ठेवलेलं.
याला प्रतिउत्तर म्हणून भाजपचे आमदार अतुल भातखळकर (MLA Atul Bhatkhalkar) यांनी थेट रोहित पवारांवर पलटवार केला आहे. “केवळ पवार आडनाव एवढंच आपलं कर्तृत्व आहे, हे पंतप्रधानांवर टीका करण्यापूर्वी लक्षात ठेवलेत तर बरं होईल.”
नव्या संसद भवनाच्या इमारतीचे बांधकामावरून (new parliament building ) #CentralVista रोहित पवारांनी ट्विट केलेलं. पण आता याला अतुल भातखळकर (MLA Atul Bhatkhalkar) यांनी उत्तर दिल आहे. ते म्हणाले मुख्यमंत्री ४०० कोटी रुपये खर्चून वडिलांचे स्मारक उभरताय, त्यांना हा प्रश्न विचारा रोहित जी. एवढ्यावरच न थांबता पुढे त्यांनी म्हटले की, आपल्या गृहमंत्र्याने फ़क्त मुंबईतून केलेली वसूली दीड हजार कोटी आहे म्हणतात, ती रक्कम लसीकरणासाठी वळवा…
- कोल्हापूर चित्रनगरी येथे आंतरराष्ट्रीय सुविधांसाठी 115 कोटी रुपये
- Maharashtra Budget 2023 |श्री क्षेत्र ज्योतिबा परिसर संवर्धन प्राधीकरण 50 कोटी रुपये
- Maharashtra Budget 2023 | शेतकऱ्याच्या खात्यात थेट जमा होणार 12 हजार रुपये | नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
- Maharashtra Budget 2023 | महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत, आता 5 लाखांपर्यंत उपचार करता येणार
- …अन्यथा आयोगाविरोधात कोर्ट मध्ये जावू- देवेंद्र फडणवीस