Saturday, November 16, 2024

आरक्षण नाही, तोपर्यंत मतदान नाही- छ. संभाजी महाराज जयंतीदिनी मराठे घेणार शपथ

- Advertisement -
सद्या महाराष्ट्रात मराठा आरक्षण रद्द करण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे , आपल्या मराठा बांधवांत प्रचंड नाराजी पसरली आहे.ज्या पद्धतीने छत्रपती  शिवाजी महाराज, तसेच छत्रपती संभाजी महाराज प्रत्येक लढाई बुद्धीचातुर्याने लढले व स्वराज्य स्थापन केलं , जतन केलं , त्याच पद्धतीनं माझ्या बांधवांनो ,ही आरक्षणाची लढाई आपल्याला बुद्धीचातूर्याने लढायची आहे , ज्या गलिच्छ आणि श्रेय वादाच्या राजकारणामुळे मराठा आरक्षण रद्द झाल, त्या नीच आणि हरामखोर नेत्यांना व पुढाऱ्यांना अद्दल घडवायची असेल तर ह्यावेळी आपण सर्वांनी कोरोनाच्या ह्या भीषण महामारीत रस्त्यावर येऊन , बाहेर येऊन स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा जीव धोक्यात न घालता , यंदाची स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांची जयंती एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी करू.ती अशी की , प्रत्येकाने फोटोपूजनाबरोबरच घरी उपलब्ध असलेल्या साधनांतून सर्व राजकीय पक्षांच्या निषेधार्थ मतदानावर बहिष्कार टाकणाऱ्या पोस्ट लिहून आपली भावना व्यक्त करावी. जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कुणीही मतदान करणार नाही अशी प्रत्येकाने शपथ घ्यायची आहे. (No reservation, no voting until-  Marathas will take oath on Sambhaji Maharaj's birthday)
प्रमोद आरसुळ  (मराठासेवक समिती, महाराष्ट्र राज्य)

मराठा आरक्षण रद्द होण्यापाठीमागे सर्वपक्षीय राजकारणच कारणीभूत ठरले, मराठा समाजाच्या तरुणांच्या भविष्याचा खेळखंडोबा करणाऱ्या ह्या पक्षांचा नाकर्तेपणा समाजाला भोवतोय , ह्यासाठीच मराठा समाज छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती दिनी मतदानावर बहिष्कार टाकण्याची शपथ घेऊन एक नव्या पर्वाला सुरूवात करेल, लढाई हक्काची, मराठा आरक्षणाची

महेश पाटील (राष्ट्रीय क्षत्रिय जनसंसद)
ज्या लोकशाहीच्या जोरावर हे पक्षीय नेते निवडून येतात, आपल्याच मतावर सरकार स्थापन करतात. स्वतः खासदार, आमदार होतात तसेच निवडून आल्यावर मात्र 5 वर्षे जनता आमचं काहीही वाकड करू शकत नाही, ह्या अविर्भावात जगणाऱ्या ह्या पुढाऱ्यांचे नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही. हीच खरी वेळ आहे आता प्रत्येक मावळ्याने आपल्या कर्तव्याप्रती जागरूक होण्याची. आणि अशाच पद्धतीने संपूर्ण जगाला महाराष्ट्रातील मराठ्यांची, एकतेची ताकद दाखवून देऊ.
सारिका भोसले ( मराठा विद्यार्थी परिषद)

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles