Monday, November 25, 2024

आघाडी सरकारने मराठा आरक्षणाचा खून केला आहे -चंद्रकांत पाटील

- Advertisement -

“भारतीय जनता पार्टी कायमच मराठा समाजासोबतच असेल. मराठा आरक्षणासंदर्भात कोर्टाचे निकालपत्र वाचल्यावर मराठा समाजाला आरक्षण द्यायची इच्छा मनात नसणाऱ्या महाविकास आघाडीने मराठा समाजाची केलेली फसवणूक उघड झाली आहे. या निराशेच्या काळात भारतीय जनता पार्टी कायम मराठा समाजाच्या सोबतच आहे. म्हणूनच भाजपा महाराष्ट्रच्या वतीने मराठा आरक्षणासंदर्भात माझ्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या आजच्या बैठकीत यापुढे आरक्षणासाठी मराठा समाजाद्वारे होणाऱ्या प्रत्येक आंदोलनात भारतीय जनता पार्टी स्वतःची पक्षीय ओळख विसरून कायमच मराठा समाजासोबत असेल असा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे.” अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.

मराठा आरक्षणावर अभ्यास करण्यासाठी भाजपने एक समिती स्थापन केली आहे. चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आशिष शेलार, विनायक मेटे, नरेंद्र पाटील आणि श्रीकांत भारतीय यांचा समावेश आहे. आज या बैठकीची पहिली बैठक झाली. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी एक पत्रकार परिषद घेऊन बैठकीतील चर्चेची माहिती दिली. यावेळी त्यांनी आघाडी सरकारवर सडकून टीका केली. फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. घटनात्मक कार्यवाही करून हे आरक्षण देण्यात आलं होतं. हायकोर्टातही हे आरक्षण टिकवलं होतं आणि सर्वोच्च न्यायालयात या आरक्षणाला वर्षभर स्थगिती मिळवू दिली नाही. पण आघाडी सरकारने सत्तेत येताच या आरक्षणाचा खून केला. मुडदा पाडला. माती केली, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.(Alliance government has murdered Maratha reservation: Chandrakant Patil)

समितीची पहिली बैठक रविवारी मुंबईत झाली.  सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द ठरविल्यानंतर मराठा समाजाला एकटे पडल्यासारखे वाटत आहे.  पुन्हा आरक्षण मिळण्यासाठी मराठा समाजातील विविध संघटना जे आंदोलन करतील, त्यामध्ये भाजप सहभागी होईल. आंदोलनात पक्षाचा झेंडा किंवा नाव असणार नाही, असे पाटील यांनी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles