राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे आयोजित ‘फेसबुक लाईव्ह’मध्ये राज्य सेवा आयोगाची परीक्षा घेण्याची राज्य सरकारची तयारी आहे. मात्र, कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन या परीक्षांचे आयोजन करण्यास आयोगाला सांगण्यात आले आहे. तसेच पोलिस, आरोग्य, शिक्षण या खात्यांमधील भरती करण्याची प्रक्रियाही राज्य सरकारने सुरू केली आहे. त्यासाठी आर्थिक तरतूदही करण्यात आली आहे. लवकरच त्याचा कार्यक्रम जाहीर होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फेसबुक लाईव्हमध्ये सांगितली.
हेही वाचा
सरकारच्या दिरंगाईमुळे जॉइनिग मिळत नसल्याने नैराशेतून विद्यार्थ्याची आत्महत्या
गेली दोन वर्ष मराठा आरक्षण, कोरोना यामुळे नवीन नोकरभरती करण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. वाढत चाललेल वय, राहण्याचा खर्च यामुळे विद्यार्थी हतबल झाले आहेत. 2019 च्या निवड झालेल्या उमेदवारांना अजूनही जॉयनिंग दिलेल नाही. यामुळे एमपीएससी कराव की नाही हाच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.