Monday, September 9, 2024

महाराष्ट्र कधीही झुकला नाही, झुकणार नाही -अजित पवार

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसच्या २२ व्या वर्धापनदिनानिमित्त शरद पवार यांच्यासह इतर नेत्यांनी समाजमाध्यमाद्वारे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं. आपलं सरकार स्थिरस्थावर होत नाही तोच कोरोनाचं संकट आलं. मधल्या काळात राज्यात दोन वादळं येऊन गेली. या संकटाचा आघाडी सरकारने सामना केला, असं सांगतानाच कितीही संकट येवोत, आव्हान येवोत महाराष्ट्र कधी झुकला नाही आणि झुकणार नाही, असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठणकावून सांगितलं. (ncp leader ajit pawar address NCP foundation day)

काल सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांशी संवाद साधतना अजित पवार बोलत होते. राज्यात आघाडीचं सरकार आल्यानंतर नैसर्गिक संकटं आली. या संकटाचा आपण सामना केला. यापुढेही आपल्याला आव्हानाचं रुपांतर संधीत करावं लागणार आहे. महाविकास आघाडी सरकारने लोककल्याणाची कामं केली आहेत. ही कामे लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे, असं पवार म्हणाले.

भाजपची सत्ता आल्यापासून देशाची एकता, अखंडतेस धक्का देण्याचे काम सुरू आहे. लोकशाही टिकवून ठेवणाऱ्या संस्था मोडीत निघाल्या. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेची अवस्था गंभीर आहे. त्यांना स्वातंत्र्य किती आहे, त्यांच्यावर कशाप्रकारे दबाव टाकला जातो, लोकशाही संकटात आल्यासारखे वाटते आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टीका केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles