Friday, July 19, 2024

सरकारच्या दिरंगाईमुळे जॉइनिग मिळत नसल्याने नैराशेतून विद्यार्थ्याची आत्महत्या

- Advertisement -

गेली काही महिने विविध कारणांमुळे सरकारी नोकर भरतीच्या प्रक्रियेमध्ये एकसूत्रता नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. ज्या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झालेले आहे, अशा उमेदवारांना अजून जॉइनिंग मिळालेली नाही. गेली दीड वर्ष झाले हे उमेदवार बाहेर खाजगी कंपनी मध्ये काम करत आहेत. तर काहींना बाहेर खाजगी मध्ये काम ही मिळत नाहीत. 

या अशा परिस्थितीमध्ये विठ्ठल भीगोट या विद्यार्थ्याने नैराश्यातून आत्महत्या केली. (Student commits suicide out of frustration) तो औरंगाबाद जिल्ह्यामधील असून स्टेट बोर्ड लिपिक मध्ये त्याचे सिलेक्शन झालेले होते. पण अजूनही जॉइनिंग न मिळाल्यामुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला, असे त्याच्या मित्रांकडून सांगण्यातआले. (Student commits suicide out of frustration over not getting joining due to government delay)

स्टेट बोर्ड लिपिक भरती मधील आमचा सहकारी विठ्ठल भीगोट यांनी रिझल्ट लागून १८ महिने झाले असतानाही नियुक्ती मिळाली नाही म्हणून आज स्वतःचा जीव गमावला. त्याला हे पाऊल फक्त राज्य सरकारच्या दिरंगाई मुळे (government delay) उचलावे लागले आहेत. 
विष्णु चव्हाण (स्पर्धा परीक्षा विद्यार्थी)

मराठा आरक्षण मुळे पेंडिंग असलेले 2185 उमेदवार ही याच सरकारच्या दिरंगाईचे लाभार्थी आहेत. मा. सुप्रीम कोर्ट ने सांगूनही अजून त्यांना नियुक्त्या दिलेल्या नाहीत. हजारो वेळा पाठपुरावा करूनही त्यांची दखल कोणीही घेतलेली नाही. यामुळे सरकारने याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे.

विश्वंभर भोपळे, मराठा विद्यार्थी परिषद, महाराष्ट्र राज्य

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles