गेली काही दिवस कोल्हापुरात पॉझिटिव्हिटी रेट सर्वाधिक आहे. राज्यात सर्वात जास्त रुग्णवाढ कोल्हापुरात होत आहे. त्यामुळे कोल्हापुरात निर्बंध कमी करण्याचा अजिबात विचार नाही, उलट ते अधिक कडक केले जातील. आम्हाला निर्बंध लादण्यात हौस नाही, थोडं सोसा, कोल्हापुरात निर्बंध अधिक कडक करणार. बऱ्याच लोकांच्या तोंडावर मास्क नाही, रुमाल लावतात, पोलीस आले की रुमाल वर करतात. असं करु नका, तुम्हाला कोरोना झाला की बाकीच्या निष्पाप लोकांना त्याचा फटका बसतो. निर्बंध कडक अंमलबजावणी व्हायला हवी”, असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ठणकावून सांगितलं. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोल्हापुरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांनी माहिती दिली.
कोल्हापुरातील निर्बंध अजिबात शिथील करणार नाही. उलट नियम पाळले जात नसतील तर अधिक कडक करण्यात येतील असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. आपल्या जिल्ह्यातील कोरोना कमी करण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन अजित पवार यांनी कोल्हापूरवासियांना केलं आहे.
महाराष्ट्रातील सर्वात जास्त पॉझिटिव्हीचं प्रमाण कोल्हापुरात आहे. यामुळे येथे निर्बंध अजिबात शिथील केले जाणार नाहीत. उलट कोणी नियम पाळत नसतील तर अधिक कडक केले जातील. आम्ही निर्बंध लादण्यासाठी येत नाही. पण कोल्हापूरने लवकरात बाहेर पडावं यासाठी थोडा वेळ सोसावं लागणार आहे. सकाळी मी अनेकांना मास्कविना पाहिलं. काही जण मास्कऐजी रुमाल वापरतात आणि पोलीस दिसले की तो रुमाल लावतात, असं करु नका, तुम्ही आपलं आरोग्य धोक्यात घालत आहात, निष्पापांनाही याचा फटका बसत आहे. पोलीस, जिल्हाधिकाऱ्यांना निर्बंधांची कडकपणे अमलबजावणी करण्यास सांगितलं आहे,” असं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.
खासगी रुग्णालयांनी नियमाप्राणे बिलं लावावीत
टेस्टिंग दीड ते दुप्पट वाढलं पाहिजे असं जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं आहे. टेस्टिंगनंतर रुग्णसंख्या सुरुवातीला वाढली तरी चालेल पण नंतर ते कमी होईल. टेस्टिंग न झाल्याने लोक बाहेर फिरत असतात, त्यामुळे इतरांनाही संसर्ग होतो त्यामुळे वाढवणं गरजेचं आहे, असं अजित पवारांनी यावेळी सांगितलं, दरम्यान खासगी रुग्णालयांनी नियमाप्राणे बिलं लावावीत, कारण नसताना जास्त बिल लावू नये अशी सूचनाही दिली असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.