Tuesday, November 12, 2024

राज्य सरकारने तातडीने विशेष अधिवेशन बोलवाव – छत्रपती उदयनराजे भोसले

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती उदयनराजे यांच्यातील बैठक अखेर पार पडली आहे. यामध्ये संभाजीराजेंच्या भूमिकेला माझा पाठिंबा आहे असे छत्रपती उदयनराजे यांनी संगितले.

दिशभूल करणं आमच्या रक्तात नाही

दिशभूल करणं आमच्या रक्तात नाही असं संभाजीराजेंनी म्हटलंय. पाच मागण्या राज्य सरकारकडे केल्या आहेत, त्या त्यांच्या हातात आहेत, त्यांनी लवकर त्या मार्गी लावाव्यात,असं सभाजीराजेंनी म्हटलंय.आता लोकप्रतिनिधींनी यावर बोलण्याची वेळ आली आहे, विशेष अधिवेशनाच्या माध्यमातून तोडगा निघू शकतो, असंही त्यांनी म्हटलंय.

आपण जात कधी पाहिलेली नाही, पण आता तर लहानपणाचे मित्रदेखील अंतर ठेवून बोलतात. ही फळी कोण निर्माण करत आहे, तर ते राज्यकर्ते करत आहे. समाजाचा याच्याशी काही संबंध नाही. आरक्षण द्यायची इच्छाच नसून राजकारण करायचं आहे. व्यक्तीकेंद्रीत राजकारण सुरु असून उद्रेक झाला तर राज्यकर्ते जबाबदार असतील. त्यावेळी आम्हीदेखील थांबवू शकणार नाही. आम्ही आडवे आलो तर आमच्यावरही हल्ला करायला थांबणार नाहीत. अशी वेळ येऊ देऊ नका, पण ही वेळ येणार आहे, अशी भीती उदयनराजेंनी व्यक्त केली आहे.

मराठ्यांना आरक्षण हे एकच ध्येय आहे. राज्यकर्त्यांना फार मुभा दिली. निवडून आलं म्हणजे आपलं सगळं असं समजू नका. लोकशाहीचे हे राजे आहेत, त्यांना जाब विचारला पाहिजे. माझं ठाम मत आहे, आडवा आणि गाडा, जाब विचारा.. सुरुवात माझ्यापासून करा. आमच्या वाड्यावर येऊन विचारा… माझ्याप्रमाणे सर्वांना विचारा.. खरं खोटं करा.. किती काळ संभ्रमावस्थेत ठेवणार, असा सवालही त्यांनी केला.

राज्यकर्त्यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचंच नाही. त्यांची इच्छाशक्तीच नाही. आजचे राजकारणी व्यक्तीकेंद्रीत झाले आहेत. त्यामुळे उद्या समाजाचा उद्रेक झाला तर त्याला जबाबदार कोण?, असा सवाल करतानाच कोर्ट कचेऱ्यांवर माझा विश्वास नाही, असं भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितलं.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles