जिल्हा परिषद ZP Exam भरतीला अजूनही वेळ आलेला दिसत नाही किंबहुना भरती होणार आहे का की निवडणूक येईपर्यंत विद्यार्थ्यांना फक्त आश्वासनावरच अभ्यास करायला लागणार आहे, हा प्रश्न सर्वांना पडला आहे. मागील काही वर्षात बरेच घोटाळे स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने बाहेर काढून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला होता. TCS, IBPS सारख्या कंपन्या निवडण्यासाठी समितीने सरकार कडे पाठपुरावा करून घोटाळे होऊ नयेत म्हणून याचीही दाखल घेतली.
gramsevak bharti |ग्रामसेवकभरतीचे ‘या’ दिवशी जाहीरहोणार वेळापत्रक
एमपीएससीचे विद्यार्थी पुन्हा या दिवशी आंदोलन करणार | mpsc full form
talathi bharti 2022 | तलाठी परीक्षेसाठीचा नवीन अभ्यासक्रम जाणून घ्या
पण सरकारने आता या ZP Exam प्रक्रियेला वेग देणं गरजेचं होत. फक्त GR काढून विद्यार्थ्यांना आशेवर ठेवण्यात येत आहे अशी चर्चा विद्यार्थ्यांमध्ये होत आहे. प्रॅक्टिकली ऑनलाइन परीक्षा या कंपन्यांकडून एकाच वेळी राज्यातील सर्व ठिकाणी करणे शक्य आहे का? तर कदाचित याच उत्तर नाही हेच असावं. कारण काल शुक्रवार दिनांक 6 रोजी भंडारा जिल्हा परिषदेने ग्राम विकास विभागाला एक पत्र पाठवले आहे. त्यामध्ये “मार्च 2019 च्या मेगा भरती जाहीरातीच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाशी संबंधित पदभरती संबंधाने परीक्षेच्या आयोजना करता कंपनीची निवड करणे” या विषयाचे पत्र पाठवले आहे.
यामध्ये त्यांनी असे नमूद केले आहे की टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस लिमिटेड आणि IBPS या दोन्ही कंपनीसोबत चर्चा झाली. यामध्ये कंपनीकडे संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध सेंटर नुसार एका शिफ्ट मध्ये जास्तीत जास्त 7500 ते 8000 उमेदवारांची परीक्षा घेण्याचे क्षमता आहे एका दिवशी जास्तीत जास्त 300 मध्ये 24000 उमेदवारांची परीक्षा घेता येईल. ZP Exam
- कंपनीसोबत करार करावयाचा झाल्यास संपूर्ण प्रक्रिया करून करार करायला किमान चार ते सहा आठवड्यांचा कालावधी लागेल
- भरती प्रक्रियेत अंतर्गत परीक्षेच्या आयोजना संबंधांचे करार झाल्यास परीक्षेच्या आयोजनाकरिता किमान 90 दिवसांचा कालावधी लागेल
- भंडारा जिल्ह्यात टीसीएस कंपनीचे परीक्षा सेंटर उपलब्ध नाहीत त्यामुळे भंडारा जिल्ह्यात परीक्षा घेता येणे शक्य नाही कारण भंडारा जिल्ह्यामध्ये त्या प्रमाणात कॉम्प्युटर लॅब उपलब्ध नाहीत
- उपरोक्त बाबींचा विचार करता शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे दिलेल्या वेळापत्रकानुसार एकाच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात परीक्षा घेणे शक्य नाही अशी माहिती टीसीएस कंपनीकडून देण्यात आलेले आहे.
- अशाच पद्धतीने आयबीपीएस कंपनीनेही सांगितले आहे त्यामध्ये त्यांनी म्हटले की शासन निर्णय वेळापत्रकात व परीक्षेच्या आयोजना संदर्भात थोडी लवचिकता निर्माण केल्यासच संपूर्ण महाराष्ट्रात पदभरती परीक्षा आयोजित करणे शक्य होईल.
झालेल्या चर्चेनुसार तसेच कंपनीकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत रिक्त पदांची भरती प्रक्रिया दिलेल्या वेळापत्रकानुसार करणे शक्य नाही उपरोक्त पदभरती प्रक्रिया यशस्वीपणे राबवण्याच्या संबंधाने मार्गदर्शन करण्यात यावे” ZP Exam
एकंदरीत पाहता जिल्हा परिषद भरती नवीन वर्षात कधी होईल अद्यापही स्पष्ट होत नाही. जर यंत्रणा सुसज्ज नसेल तर ऑनलाईन पदभरती कशासाठी? असा प्रश्न विद्यार्थी करत आहेत.
"भंडारा जिल्हा परिषदेने सरळसेवा भरतीसाठी कंपनी निवडीच्या प्रक्रियेबाबत ग्रामविकास विभागाला पत्र लिहीत सद्यस्थिती कळविली आहे. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर, कंपनीशी करावयाच्या करारासाठी आणि एकूणच प्रक्रियेसाठी दीड-दोन महिने लागतील सांगितले होते, तेच आज या पत्रातून अधोरेखित होत आहे. या पत्रानुसार TCS सोबतच्या करारासाठी ४-६ आठवडे लागणार असून त्यानंतरच भरतीची जाहिरात आणि इतर प्रक्रिया सुरू होतील. सदर पत्र जाहीर होण्याआधी या बाबींची चर्चा आम्ही भंडारा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सोबतही केली होती. अर्थातच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात TCS/IBPS ची परीक्षा केंद्रे उपलब्ध नाहीत त्यामुळे यातून ग्रामविकास विभाग कोणता मधला मार्ग काढतो याकडे लक्ष लागले आहे. याबाबत ग्रामविकास विभागाने लवकर निर्णय घ्यावा व वेळापत्रकानुसारच जाहिराती प्रसिद्ध कराव्या यासाठी स्पर्धा परीक्षा समन्वय समिती पाठपुरावा करीत आहे. अशी माहिती स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य यांनी दिली आहे. "