रविवारी देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील नवीन भाजप कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी कार्यालयाची पाहणी केल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. तलाठी भरतीत राज्यात मोठा गैरव्यवहार झाल्याचे आरोप करण्यात आले आहेत. याबाबत विचारणा केली असता फडणवीस म्हणाले की, तलाठी भरती परीक्षा ही राज्यात अतिशय पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आली. या परीक्षेत कोणताही गैरव्यवहार झाल्याचा पुरावा कोणीही दिल्यास त्याची चौकशी केली जाईल. पुरावे योग्य असल्यास चौकशी करून ही परीक्षा रद्द केली जाईल आणि दोषींवर कारवाईही केली जाईल. अशी प्रतिक्रिया दिली.
talathi bharti | तलाठी भरती घोटाळ्याबाबत सरकारनं दिलं स्पष्टीकरण
यावर स्पर्धा परीक्षा समितीने थेट एक्स वर पुरवाच सादर करून चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी अस म्हंटल आहे, “हे पत्र संभाजीनगर पोलीसांनी, तलाठी परीक्षेचे नियोजन करणाऱ्या महसूलच्या भूमीअभिलेख विभागाला लिहिले आहे. यात संभाजीनगर पोलीसांनी स्पष्टपणे नमूद केलं आहे की नागपूर येथील परीक्षा केंद्रावरून एका उमेदवाराने पेपर फोडून बाहेर पाठविला. ती प्रश्न पत्रिका संभाजीनगर येथील परीक्षा केंद्रावर पाठविण्यात आली होती, तेथील TCS ION परीक्षा केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी पैसे भरून सेटिंग लावलेल्या उमेदवारांना त्यांच्या आसनापर्यंत जाऊन प्रश्नांची उत्तरे पुरविली. पण त्या सर्वांचे बिंग फुटले आणि तपासात या गोष्टी समोर आल्या. पण फोडलेला पेपर अनेक ठिकाणी पाठविला असण्याची शक्यता आहे, फक्त त्याच केंद्रावरील पर्यवेक्षकाला अटक झाली, इतर ठिकाणचे काय? इतर परीक्षा केंद्र सुद्धा मॅनेज झाले असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच तलाठीच्या कट-ऑफने मोठी उंची गाठली आहे. तलाठी पेपर फुटल्यानंतर मंत्रालयातून फोन गेल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या, म्हणजे सर्वांनी समजून जावे याचे तार कुठवर जोडले गेले असतील. तलाठी परीक्षेत मोठा भ्रष्टाचार झाला असून सदर परीक्षा रद्द करून तात्काळ MPSC मार्फत घेण्यात यावी. भ्रष्टाचारामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील उमेदवार संतप्त आहेत. सरकारने आमच्या मागण्या मान्य न केल्यास सबंध महाराष्ट्रात मोठं आंदोलन उभं राहिल्याशिवाय राहणार नाही.” अशी प्रतिक्रिया समितीने दिली आहे.
तलाठी पेपर लवकरात लवकर रद्द करून तो एमपीएससी मार्फत होणार का ?
तलाठी भरती मधील आरोपी राजू नागरे हा अट्टल पेपर फोड्या आहे. 6 ते 7 वर्षापासून तो पेपर फोडत आला आहे. 6 वर्षापासून त्याच्यावर गुन्हे दाखल होत आहेत. आताही तो मुंबई पोलीस भरती घोटाळा, वनभरती घोटाळा मध्ये सुध्दा आरोपी आहे. तलाठी मध्ये ज्यावेळी याला अटक करण्यात आली होती त्यावेळी याला सोडून द्या असा कॉल मंत्रालयातून आला होता. असा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला आहे.