मोदी सरकारने चालू केलेल्या वंदे भारत एक्स्प्रेसची भुरळ सर्वानाच पडली आहे. वंदे भारतवरून विरोधकानी बऱ्याच टिपण्या केलेल्या होती. या वंदे भारतमधून प्रवासाचा आनंद सर्वसामान्यांप्रमाणे राजकारणी लोकही घेत असतात. भाजप सरकारवर टीकेची एकही संधी न सोडणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वंदे भारत एक्सप्रेसमधून प्रवास केला. आणि हाच चर्चेचा विषय झाला. हाच मुद्दा घेऊन भाजपने उद्धव ठाकरे यांचा वंदे भारतमधील प्रवासाचा फोटो ट्विट करत तिसरी बार….. मोदी सरकार ! कॅप्शन दिले आहे.
वंदे भारत एक्सप्रेस हा मोदी सरकारचा एक महत्वकांक्षी प्रकल्प आहे. बुलेट ट्रेन आणि वंदे भारत ट्रेनसाठी मोदी सरकारने मोठे काम केले आहे. त्यामुळे भाजपने उद्धव ठाकरे यांच्या वंदे भारत प्रवासाचे दोन फोटो ट्विट केले आहे.
पहिल्या फोटोत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे दिसत आहेत. दुसऱ्या फोटोमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत विनायक राऊत दिसत आहे. भाजपने म्हटले आहे की, मोदी सरकारच्या विकासाचे लाभार्थी, वंदेभारत ट्रेनचा आरामदायी प्रवास, तिसरी बार….. मोदी सरकार !
लवकरच बुलेट ट्रेन ची देखील सफर घडवून आणणार
“कुठे आहे विकास ? म्हणून ओरडणारे उबाठा जेव्हा वंदे भारत ट्रेन मधून प्रवास करून लाभार्थी होतात तेव्हा समाधान वाटतं. लवकरच बुलेट ट्रेन ची देखील सफर घडवून आणणार हे नक्की कारण” असे एक्स वरून पोस्ट करून भाजपने ठाकरे यांना डिवचल आहे. भाजपने हे फोटो उद्धव ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना टॅग केले आहेत.