Tuesday, October 8, 2024

बारामती लोकसभेसाठी अजित पवारांनी रणशिंग फुंकलं | Baramati loksabha

- Advertisement -

काही दिवसातच लोकसभेचे चित्र स्पष्ट होईल. त्यामुळे सर्वच पक्षांकडून जाहीर सभांना सुरुवात झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही पक्षांकडे जागावाटपाचा तिढा निर्माण झाला आहे. हा तिढा सुटल्यावर जागावाटप होईल. त्यामुळे आगामी निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. दरम्यान, मी जिथं उमेदवार जाहीर करेन, तिथं मीच उभा आहे असं समजून मतदान करा, असं आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. बारामती दौऱ्यामध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अत्यंत कठोर शब्दांमध्ये टीका करतानाच बारामतीसाठी Baramati loksabha मीच उभा आहे असं समजून मी देणाऱ्या उमेदवाराला मतदान करा, असं आवाहन अजित पवार (ajit pawar) यांनी केले.

Baramati loksabha बारामतीमध्ये बोलताना त्यांनी आपण घेतलेली भूमिका कशी योग्य हे सुद्धा त्यांनी पटवून देण्याचा प्रयत्न केला. मी पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झाल्यावर बारामतीमध्ये माझे अशा पद्धतीने स्वागत करतील, असे वाटले नव्हते. अनेक मिरवणूक बघितल्या, वरिष्ठांच्या बघितल्या पण असं स्वागत कधी झालं नव्हतं. सगळेच भूमिका घेणार होते, हवं तर खासगीत विचारा, असा सुद्धा दावा अजित पवार यांनी केला. आज वातावरण मोदींना संधी द्यावी या पद्धतीनेच आहे. मोदी सरकारने अनेकशासकीय योजना आणल्या आहेत. भारताचे नाव जगामध्ये उंचावले आहे. मी सरकारमध्ये असल्याने बारामतीमध्ये कामे होत आहेत. आपल्या विचाराचा खासदार झाल्यास आपली कामं झाली पाहिजेत हे मला सांगता येईल.

आधी लोकसभा आणि नंतर विधानसभा निवडणुक असणार आहे, अनेक प्रकारचे धाडसाचे निर्णय घेतले. लवकरच मी महायुतीचा उमेदवार जाहीर करणार असून मी उमेदवार आहे असे म्हणून मतदान करा, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. शेवटची निवडणूक आहे असे सांगितले जाऊन भावनिक केलं जाईल. कधी शेवटची असणार आहे काय माहित. असा टोला त्यांनी लगावला. भाषणा दरम्यान एक कार्यकर्त्याने स्टेजवर येवून हात जोडून अजित पवार यांना सांगितले की सुनेत्रा वाहिनीचे नाव घोषित करा, आणि सर्वजण हसू लागेल. यावर अजित पवार यांनी म्हंटले की याला बारामती म्हणतात.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles