महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) 2024 (MPSC exam) च्या महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाने सध्या वादाला तोंड दिले आहे. या प्रश्नामुळे परीक्षार्थी गोंधळात पडले असून, सोशल मीडियावरही या प्रश्नाची चर्चा जोरदार सुरू आहे. हा प्रश्न आणि त्यासाठी दिलेले पर्याय भविष्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या निर्णयक्षमता तपासण्यासाठी योग्य आहेत का, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
नेमका काय होता प्रश्न? | MPSC exam
एमपीएससीच्या परीक्षेतील हा प्रश्न असा होता:
“तुमच्या मित्रांना दारू पिणे आवडते आणि ते तुम्हाला त्यात सहभागी होण्यासाठी प्रेरित करत आहेत. तुम्हाला त्यांच्या सोबत जायचे नसेल आणि त्यांच्या मद्यपानाच्या सवयींपासून स्वतःला दूर ठेवायचे असल्यास, तुम्ही काय कराल?”
या प्रश्नासाठी खालील पर्याय देण्यात आले होते:
- मी माझ्या मित्रांना सांगेन की माझ्या पालकांनी मला दारू पिण्यास मनाई केली आहे.
- दारू पिण्यास नकार देईन.
- फक्त माझे मित्र पित आहेत म्हणून मीही मद्यपान करेन.
- नकार देईन आणि खोटे सांगेन की मला यकृताचा आजार आहे.
विद्यार्थ्यांचा गोंधळ आणि संभ्रम | MPSC exam
MPSC exam परीक्षेत असा प्रश्न विचारण्यात आल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी संभ्रम व्यक्त केला आहे. ही परीक्षा उत्तीर्ण होणारे उमेदवार भविष्यात क्लास वन अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळतील. अशा परिस्थितीत अशा प्रश्नांनी विद्यार्थ्यांची वैचारिक क्षमता तपासण्याचा प्रयत्न होतो की हा अनावश्यक विषय परीक्षेत येतो, यावर विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सोशल मीडियावर टीका आणि प्रतिक्रिया
या प्रश्नावर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. अनेकांनी एमपीएससीवर टीका करत विचारले आहे की, अशा प्रकारच्या प्रश्नांचा परीक्षेच्या उद्दिष्टांशी काय संबंध आहे?
- “इतक्या महत्त्वाच्या परीक्षेत असा प्रश्न का विचारला गेला?”
- “अशा प्रश्नांनी भविष्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांची क्षमता खरंच कशी तपासता येईल?”
एमपीएससीच्या MPSC exam कार्यपद्धतीवर सवाल
हा प्रश्न समोर येताच एमपीएससीच्या प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या प्रक्रियेला देखील प्रश्न विचारले जात आहेत. परीक्षार्थी आणि पालकांनी या प्रकरणावर प्रश्न उपस्थित करत म्हटले आहे की, परीक्षेचे स्वरूप गंभीर असावे, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या मूलभूत कौशल्यांची, वैचारिक क्षमतेची आणि प्रशासकीय योग्यतेची तपासणी होऊ शकेल.
प्रश्नांची गरज की फालतूपणा?
विद्यार्थ्यांच्या मते, निर्णयक्षमता तपासण्यासाठी अन्य योग्य प्रश्न विचारले जाऊ शकतात. परंतु, मद्यपानासारख्या विषयावर प्रश्न विचारणे ही अनावश्यक बाब आहे. यामुळे परीक्षेची गुणवत्ता आणि उद्दिष्टांवर नकारात्मक प्रभाव पडतो, अशी विद्यार्थ्यांची भावना आहे.
MPSC exam एमपीएससीकडून यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, या घटनेने स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांच्या दर्जावर आणि त्यांच्या उद्दिष्टांवर पुन्हा एकदा चर्चा उभी केली आहे.