Friday, May 17, 2024

पोलीस उपनिरीक्षक शारीरिक चाचणी परीक्षा पुढे ढकलली- राहुल चिकोडे यांच्या मागणीला यश

- Advertisement -

ग्रामीण भागातील हजारो मुली पीएसआय च्या परीक्षेसाठी अनेक वर्ष अभ्यास करत असतात. लेखी परीक्षा पास झाल्यावर शारीरिक चाचणी ही द्यावी लागते. पण सध्या वाढत असलेले तापमान, परीक्षेमध्ये केलेले नवीन बदल आणि निवडणुकीची लगबग त्यामुळे पुढील आठवड्यात होणारी शारीरिकचाचणी पुढे ढकलणीची विद्यार्थिनींची मागणी होती.

यासाठी आज कोल्हापूर जिल्हातील स्पर्धापरीक्षा देणाऱ्या विद्यार्थिनीनी भाजपा प्रदेश कार्यकारणीचे सदस्य राहुल चिकोड यांची भेट घेवून त्यांना याबाबत सविस्तर माहिती देवून निवेदन दिले. तत्काळ राहुल चिकोड यांनी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील तसेच मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे यांच्या PA सोबत संपर्क साधून त्यांना याबाबत माहिती देवून परीक्षा पुढे ढकलण्याबाबत विनंती केली. तत्काळ याकडे सरकारने लक्ष दिले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आज नोटीफिकेशन काढून परीक्षा पुढे ढकलल्याचे सांगितले आहे. परीक्षेची नवीन तारीख लवकरच सांगण्यात येईल असेही त्यामध्ये नमूद केले आहे.

विद्यार्थ्यांनी निवेदनात म्हंटले होते की, पुरुष आणि महिलांच्या शारीरिक क्षमतेतील फरक लक्षात घेता महिलांना धावण्यासाठी पुरुषांच्या तुलनेने दिलेला अर्धा वेळ आणि लांब उडीचे अंतर हे महिलांच्या शारीरिक क्षमतेचा विचार करता कठीण आहे. याचा परिणाम 2021 मध्ये महिला उपनिरीक्षक उमेदवारांना झाला. 2021 मध्ये महिला उमेदवारांना दीड वर्षाचा प्रदीर्घ कालावधी मिळाला तरी देखील 122 जागांसाठी फक्त 167 महिला शारीरिक चाचणीसाठी उपस्थित होत्या त्यापैकी केवळ 64 महिला उमेदवार पात्र झाल्या व 48 जागा रिक्त राहिल्या. 2022 साली महिला उमेदवारांना तीन महिन्यांचा कालावधी मिळाला. पण हा कालावधी महिला उमेदवारांची शारीरिक क्षमता विचारात घेता खूप कमी आहे. कारण काही महिला उमेदवारांचे प्रॉब्लेम तसेच तयार दरम्यान झालेल्या दुखापती यामुळे हा कालावधी 2022 च्या महिला उमेदवारांना वाढवून मिळावा अशी मागणी भाजपा प्रदेश कार्यकारणीचे सदस्य राहुल चिकोड यांच्याकडे करण्यात आलेली होती.

सध्याचे वातावरण पाहता शारीरिक चाचणी परीक्षेची तयारी करणे खुप कठीण होत आहे. वाढत्या तापमानामुळे अनेक उमेदवार आजारी पडलेले आहेत. त्यामुळे आम्ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केलेली. सरकारने याकडे तत्काळ लक्ष देत आमची मागणी मान्य केल्याबद्दल आभारी आहे. 
- मंगेश हजारे, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी, कोल्हापूर.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles