केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी घेतली खासदार धनंजय महाडिक यांची भेट

केंद्रीय मंत्री नामदार ज्योतिरादित्य सिंधिया कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. रविवारी रात्री नामदार सिंधिया यांनी राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांची सदिच्छा भेट घेतली. विकासवाडी इथल्या महाडिक फार्मवर खासदार महाडिक यांनी नामदार ज्योतिरादित्य सिंदीया यांचे स्वागत केले.

हेही वाचा – Chhava movie | ‘छावा’ चित्रपटावरून वाद, लक्ष्मण उतेकरांचा मोठा निर्णय

खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त बालकल्याण संकुलातील मुलांना अन्नधान्य, कपडे आणि इतर भेटवस्तूंचे झाले वाटप

यावेळी उभयतांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. नामदार सिंधिया यांनी सहकुटुंब महाडिक फार्मला भेट देऊन, कौटुंबिक जिव्हाळा वृद्धिंगत केला. यावेळी खासदार धनंजय महाडिक यांच्यासह भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक, आमदार अमल महाडिक, भाजपच्या महिला आघाडीच्या राज्य उपाध्यक्षा सौ. शोमिका महाडिक, पृथ्वीराज महाडिक, सौ. वैष्णवी महाडिक , श्री. कृष्णराज महाडिक, कुमारी शांभवी अमल महाडिक उपस्थित होते.

swapnil patil  के बारे में
For Feedback - sp17111994@gmail.com