Friday, July 26, 2024

अग्निपथ योजना (Agnipath Yojana) | संपूर्ण माहिती जाणून घ्या

- Advertisement -

अग्निपथ योजना (Agnipath Yojana) केंद्रीय संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते सुरु करण्यात आली. अग्निपथ योजनेला मंत्रिमंडळाच्या सूक्ष्म व्यवहार समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली, शासनाकडून हि योजना सुरु करण्याचा निर्णय 14 जून 2022 रोजी घेण्यात आला होता, ही योजना रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात प्रभावी ठरेल तसेच या योजनेच्या अंमलबजावणीमुळे देशाच्या सुरक्षिततेमध्ये मजबुती येईल.

अग्निपथ योजना काय आहे? | What is the Agnipath Scheme?

14 जून 2022 रोजी, सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीने अग्निपथ योजनेला मंजुरी दिली, जी भारतीय तरुणांना भारतीय सशस्त्र दलात सेवा करण्यास सक्षम करते. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, ‘अग्निपथ’ योजनेच्या (Agneepath Yojana)  माध्यमातून तरुणांना सशस्त्र दलात सेवा करण्याची संधी निर्माण करण्यासाठी सर्व उपयुक्त प्रयत्न केले जातील. या योजनेमुळे तरुणांना नवीन तंत्रज्ञान प्रशिक्षित आणि शिकण्यास आणि त्यांच्या आरोग्याची पातळी सुधारण्यास मदत होईल. रोजगाराच्या वाढत्या संधींमुळे तरुणांना विविध क्षेत्रात नवीन कौशल्ये शिकायला मिळतील. अग्निपथ योजनेंतर्गत सशस्त्र दलाचा भाग असणारे उमेदवार ‘अग्निवीर’ असतील.

अग्निपथ योजनेचे उद्दिष्ट | Objective of the Agnipath Scheme

  • भारतीय सैन्यात युवा शक्तीला समाविष्ट करणे तसेच अग्निपथ योजना (Agnipath Yojana) योजनेच्या माध्यमातून बेरोजगारी कमी
  • देशातील तरुणांना देशसेवा करण्याची संधी उपलब्ध करुण देणे.
  • सशस्त्र दलांमध्ये नवीन तंत्रज्ञान आणि कौशल्ये आणणे.

अग्निपथ योजनेचे लाभ व फायदे | Benefits and Advantages of the Agnipath Scheme

  • अग्निपथ योजना (Agneepath Yojana) योजनेंतर्गत अग्निवीरांना पहील्या वर्षी 4.76 लाख आणि चौथ्या वर्षी 6.92 लाख पॅकेज असेल.
  • या योजनेंतर्गत अग्निवीरांना सामान्य सैनिकांना दिले जाणारे सर्व भत्ते दिले जाणार आहेत.
  • प्रत्येक अग्निवीराला त्याच्या/ तिच्या मासिक पगाराच्या 30 टक्के योगदान द्यावे, तितकीच रक्कम सरकार कडूनही दिली जाणार आहे. चार वर्षे पूर्ण झाल्यावर अग्निवीराला 11.71 लाख रुपयांची धनराशी दिली जाणार आहे. (जी संपूर्ण आयकर मुक्त असेल)
  • अग्निवीरांना 44 लाखांचे विना सहयोगी जीवन बिमा संरक्षण प्रदान केले जाईल, सेवेदरम्यान जर अग्निवीराचा मृत्यू झाल्यास, 44 लाखांची अतिरिक्त सानुग्रह रक्कम दिली जाणार आहे, या व्यतिरिक्त 4 वर्षापर्यंत सेवा निधी घटकांचा न भरलेला भाग दिला जाईल.
  • अग्निपथ योजना (Agneepath Yojana) योजनेंतर्गत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी निर्धारित केल्यानुसार अपंगत्वाच्या टक्केवारीच्या आधारावर भरपाई दिली जाईल, अपंगत्वासाठी 44/25/15 लाख रुपयांची एकरकमी अनुग्रह धनराशी दिली जाईल.
  • कार्यकाळ संपूर्ण झाल्यावर उमेदवारांना सेवा निधी मिळू शकतो, या शिवाय संपादन केलेल्या कौशल्याचे प्रमाणपत्र आणि उच्च शिक्षणासाठी कर्जाची तरतूद केली जाईल.

अग्निपथ योजना पात्रता | Eligibility for the Agnipath Scheme

जे तरुण यासाठी पात्र आहेत तेच अग्निवीर होऊ शकतात. अग्निपथ योजना (Agneepath Yojana) या योजनेसाठी अर्ज करण्याची पात्रता खालीलप्रमाणे आहे.

  • अर्ज करणारी व्यक्ती भारताचा कायमस्वरूपी रहिवासी असावा.
  • अर्जदार किमान 10वी किंवा 12वी पास असावा.
  • अर्जदाराचे वय 17.5 ते 21 वर्षे दरम्यान असावे.
  • यासाठी महिला आणि पुरुष दोघेही अर्ज करू शकतात.

अग्निपथ योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे | Required Documents for the Agnipath Scheme

  • अर्दाराचे आधार कार्ड
  • वर्तमान रहिवासी पुरावा
  • आय प्रमाणपत्र
  • वयाचा पुरावा
  • 10 वी किंवा 12 वी वर्गाची मार्कशीट
  • वैद्यकीय प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • मोबाइल नंबर

अग्निपथ योजनेसाठी अधिकृत संकेतस्थळ | Authorized Portal for the Agnipath Scheme

https://www.mygov.in/campaigns/agniveer/

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles