आयुष्यमान भारत योजना किंवा प्रधान मंत्री जन आरोग्य योजना ही एक केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे. सदर योजना आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आयुष्यमान भारत मिशन अंतर्गत २०१८ मध्ये सुरू करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत केंद्र सरकार गरीब कुटूंब व शहरातील गरीब लोकांच्या कुटूंबांना आरोग्य विमा उपलब्ध करते. भारत सरकारच्या या योजनेंतर्गत देशातील १० कोटीहून अधिक कुटुंबांना लाभ मिळेल.
आयुष्यमान भारत योजनेचे उद्दिष्ट
देशातील दारिद्य्र रेषेखालील कुटुंबांमध्ये, एखाद्या व्यक्तीस दुर्धर आजार झाल्यास कुटुंबातील आर्थिक अडचणींमुळे, हॉस्पिटलमध्ये उपचार घेणे शक्य होत नाही. सामान्य जनतेची हीच समस्या दूर करण्यासाठी केंद्र सरकारने आयुष्यमान भारत योजना सुरु केली आहे. आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल गरीब कुटुंबांना आरोग्य विमा प्रदान करून आर्थिक सहाय्य प्रदान करण्याचा सरकारचा उद्देश आहे.
सरकारकडून मिळतं “गोल्डन कार्ड”
कोणतीही व्यक्ती या योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतींनी अर्ज करू शकते. या योजनेतंर्गत सरकार लोकांना “आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड” प्रदान करते. या योजनेंतर्गत आयुष्मान भारत गोल्डन कार्डद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिक रुग्णालयात जाऊन 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळवू शकतात.
आयुष्मान भारत कार्डचे फायदे
• या योजनेत संपूर्ण कुटुंब समाविष्ट होऊ शकते.
• हे गोल्डन कार्ड समाजातील गरीब वर्गातील लोकांना आरोग्य विम्याची सुविधा प्रदान करते.
• लाभार्थी या योजनेचा लाभ संपूर्ण देशभरात कोणत्याही सरकारी किंवा खाजगी हॉस्पिटलमध्ये अगदी मोफत घेऊ शकतात.
• कोविड पेशन्ट देखील हे कार्ड वापरू शकतात.
• सुचिबद्ध हॉस्पिटल मध्ये लोक कॅशलेस उपचारांचा लाभ घेऊ शकतात.
• या योजने अंतर्गत लाभार्थ्यांना रुपये 5 लाख पर्यंतचे कॅशलेस मोफत उपचार घेता येतील.
• तसेच तुम्हाला तुमचे आयुष्मान गोल्डन कार्ड 15 दिवसात मिळते.
आवश्यक कागदपत्रे
• आधार कार्ड
• रेशन कार्ड
• इनकम सर्टिफिकेट
• मोबाइल क्रमांक
• पासपोर्ट साईज फोटो
अधिकृत संकेतस्थळ: https://abdm.gov.in/
ई-मेल : abdm@nha.gov.inn
टोल-फ्री नंबर : १८००-११-४४७७