Friday, April 19, 2024

Breaking news | येणारा धोका समजा; नितेश राणेंचा MVA च्या आमदारांना संदेश

- Advertisement -

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची भाजपने बाजी मारली आहे. तर राष्ट्रवादीचे भगीरथ भालके ( bhagirath bhalke) यांचा पराभव झाला आहे. तर पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपच्या समाधान आवताडे( samadhan autade) यांना बहुमत मिळालं आहे.

येणारा धोका समजा, एक पाऊल पुढे टाका, भाजप हाच एकमेव पर्याय आहे, असं भाजप नेते नितेश राणे (Nitesh rane, bjp ) यांनी म्हटलं आहे. राणे यांनी अप्रत्यक्षपणे भाजपमध्ये प्रवेश करण्याचंनिमंत्रन दिलं आहे का ? यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची निवडणूक

पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणूक सत्ताधारी महाविकास आघाडीसाठी (MVA) प्रतिष्ठेची मानली जात आहे.

संपूर्ण मंगळवेढा तालुका आणि पंढरपूर शहर आणि याच तालुक्यातली 22 गावे मिळून हा मतदारसंघ बनतो. पंढरपुरातली उरलेली गावे ही माढा, मोहोळ आणि सांगोला मतदारसंघात जोडली आहेत. त्यामुळे पंढरपूरच्या राजकीय घडामोडींचा सरळ प्रभाव हा या तालुक्यांवर पडतो, असं समजलं जातं.

या पोटनिवडणुकीत अनेक उमेदवार उभे आहेत. पण मुख्य लढत ही आवताडे आणि भालके यांच्यात आहे.

भगीरथ भालके यांनी नुकताच राजकारणात प्रवेश केला असला, तरी सहानुभूतीची लाट त्यांच्या बाजूने आहे. भारत भालकेंचा जनसंपर्क भगीरथ यांच्या कामी येण्याचा अंदाज आहे.

पण दुसरीकडे समाधान आवताडे यांचा स्वतःचा जनसंपर्क चांगला असल्याचं मानलं जातं. पंढरपुरातल्या सुधारक परिचारक यांच्या गटाने त्यांना पाठिंबा देण्याचं ठरवलं होतं. यामुळेच ही लढत अटीतटीची मानली जातेय.

Related Articles

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles