Maharashtra| …पण सोनिया गांधी ‘सामना’ ची दखल घेतात- संजय राऊत

Live Janmat

गेले दोन दिवस कॉंग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये सामना वरून चांगलेच वातावरण तापले आहे. ‘सामना’च्या अग्रलेखातून नाना पटोले यांना पुन्हा एकदा चिमटा काढण्यात आला. सोनिया गांधी यांनी कार्यकारिणीच्या बैठकीत विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या निराशाजनक कामगिरीवर चिंता व्यक्त केली. निकाल इतके निराशाजनक आहेत की पक्षात काही दुरुस्त्या कराव्या लागतील. काँग्रेसला आसाम, केरळमध्ये चांगली लढत देऊनही सत्तेवर का येता आले नाही? हा प्रश्न ‘सामना’ने याच स्तंभातून विचारला. नेमका काँग्रेस कार्य समितीत श्रीमती सोनिया गांधी यांनी हाच मुद्दा उपस्थित केला. केरळ, आसामातील पराभव त्यांना टोचला व त्यांनी त्याबाबत प्रश्न उपस्थित केला. महाराष्ट्रातील जुन्याजाणत्या काँग्रेस पुढाऱ्यांनीही ‘सामना’ वाचून सोनियांपर्यंत लोकभावना पोहोचवल्या असतील तर चांगलेच आहे, असं शिवसेनेने म्हटलं आहे.

संजय राऊतांकडे आम्ही लक्ष देत नाही, अन् त्यांचा सामना पेपरदेखील वाचत नाही असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे.यावर नाना पटोले यांच्या या वक्तव्याला शिवसेनेने उत्तर दिलं आहे. “महाराष्ट्रातले काँग्रेस पुढारी आपण सामना वाचत नसल्याचा टेंभा मिरवतात हा त्यांचा प्रश्न, पण सोनिया गांधी सामनाची दखल घेतात, हे काल पुन्हा दिसून आले,” असा अप्रत्यक्ष टोला शिवसेनेने नाना पटोले यांना सामना संपादकीयमधून लगावला आहे. … but Sonia Gandhi takes notice of ‘Saamana’ – Sanjay Raut

राहुल गांधी हेच आज काँग्रेसचे सेनापती आहेत. त्यांचे सरकारवरील हल्ले अचूक आहेत. जगभरातून भारताला जी परदेशी मदत मिळू लागली आहे, त्यावर सरकारची छाती अकारण गर्वाने फुलली तेव्हा फुगलेल्या छातीचा फुगा राहुल गांधी यांनी सहज फोडला. विदेशी मदतीचा गवगवा करणे म्हणजे राष्ट्राभिमान किंवा स्वाभिमान नाही, असे ते म्हणाले त्यावर मंथन झाले, अशा शब्दांत ‘सामना’च्या अग्रलेखात राहुल गांधी यांचे कौतुक करण्यात आले आहे.

vishal  के बारे में
vishal The live janmat is a Marathi digital News web portal. We aim to report the latest news, views, and entertainment. We seek to look at policies and decision-making from the perspective of people. Read More
For Feedback - livejanmt@gmail.com