Monday, September 16, 2024

MPSC विद्यार्थ्यांवर सरकार राग काढत आहे का.?

Live Janmat

पुण्यामध्ये कोणाचा हाहाकार माजला आहे. बेड उपलब्ध नाहीत रक्ताचा पुरवठा संपत आलेला आहे. हजारो विद्यार्थ्यांना कोरोना ची लक्षण आहेत.

14 मार्च ला होणारी राज्यसेवा पूर्व परिक्षा पुढे ढकलण्यात आलेली होती, म्हणून विद्यार्थ्यांनी राज्यभर आंदोलन केलीत. शेवटी सरकारला नवीन तारिख जाहीर करायला भाग पडले. हा अनुभव लक्षात घेता राज्य सरकार येत्या रविवारी होणार्‍या संयुक्त पूर्व परीक्षा मध्ये हस्तक्षेप करणार की नाही असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. कदाचित यामुळेच विद्यार्थ्यांना वेठीस धरलं जात आहे का सवाल विद्यार्थी उपस्थित करता आहेत ?

सरकारची विद्यार्थ्यांच्या विरोधी भूमिका ?

मार्च मध्ये दिवसाला ३००० covid patient होते तेंव्हा सरकार परीक्षा नको म्हणत होते, तर विद्यार्थी परीक्षा घ्या म्हणत होते. आता दिवसाला ५९,000 covid patient सापडत आहेत. विद्यार्थी म्हणत आहेत परीक्षा नको पण सरकार परीक्षा घेण्यावर ठाम आहे अस एकंदरीत वाटत आहे.

विश्वंभर, (कोल्हापूर)

परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं असायला हवं. वाढत्या कोरोनामुळे मुलांच्या मनात भीती आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना कोरोनाची लक्षणं आहेत परंतु रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर पेपर देता येणार नाही म्हणून ही मुलं चाचणी करत नाहीत. हेच विद्यार्थी परिक्षेला गेले तर संसर्ग वाढेल. त्यात शासनाने शनिवार, रविवार पूर्ण लॉकडाऊन लागू केला आहे. त्यामुळे विद्यार्थी परीक्षेला जाणार कसे? असाही प्रश्न आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे आणि निर्बंधामुळे पेपर पुढे ढकलायला हवा अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.

आपल्याकडे संवेदनशीलता शिल्लक राहिलेली आहे का? वैभव, प्रीतम आणि विशाल हे कुणाचे ना कुणाचे भाऊ मित्र आणि आईवडिलांचे मुले होती काय वेळ आलेली असेल त्या कुटुंबावर अरे याचा एकदा विचार करा तुमचा जीव जातो तेव्हा काय उरत काहीच नाही. कोरोनापुढे सर्व हरलेत पण आपण जिंकण्याचे साहस दाखवतोय कारण आपल्यात प्रतिकारक्षमता आहे आमच्या आईवडिलांनी काय करायचे? वेळ सगळ्यांवर आलेली आहे फक्त भान ठेवा. विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय होणे अपेक्षित आहे.

राहुल कवठेकर , MPSC समन्वय समिती.

कोरोनामुळे यांनी परीक्षा रद्द केल्या

मध्यप्रदेश , बिहार सरकारने त्यांच्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. शिवाजी विद्यापीठ , सावित्री बाई फुले विद्यापीठ , यांनी एक महिना पुढे सर्व कामकाज ढकलले आहे, तर काल Goa Lighthouse चे एक्साम ही पुढे ढकलली आहे. एवढेच नाही तर कोरोनामुळे LDC & UDC च्या परीक्षा ही पुढे ढकलल्या आहेत. १०वी आणि १२वी चे पेपर ऑनलाइन घेता येतील का याचाही विचार चालू आहे. ९वी आणि ११वी यांचेही परिक्षा रद्द करून त्यांना पुढील वर्षात ढकलण्यात आले आहे. मग फक्त एमपीएससी ची परीक्षा का घेत आहे सरकार?

अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण 

एकाच खोलीत अनेक विद्यार्थी राहत असल्याने एकाला कोरोनाची लागणी झाली तर त्याचा संसर्ग इतर मुलांना होत आहे. त्यातच परीक्षा देता यावी यासाठी विद्यार्थी लक्षणं दिसत असताना चाचणी न करता काही औषधं घेऊन अभ्यास करत आहेत. त्यांच्यामुळे इतरांना संसर्ग होण्याचा धोका वाढतो आहे.

हे वाचलंत का?

मोठी बातमी| शिवाजी विद्यापीठाच्या सर्व परीक्षा आता होणार ऑनलाईन

Live Janmat

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचा निर्णय.

सध्या कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने तसेच विद्यापीठ कार्यक्षेत्रामध्ये लागू करण्यात आलेल्या संचार बंदी व इतर निर्बंध विचारात घेता ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेणे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उचित होणार नाही. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ मार्फत घेण्यात येणाऱ्या हिवाळी सत्र 2020 करिता यापूर्वी ऑफलाईन पद्धतीचा परीक्षेचा पर्याय निवडलेला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने परीक्षा देण्यासाठी युनिव्हर्सिटीच्या वेबसाइटवर लिंक उपलब्‍ध करुन देण्यात येत आहे.