Thursday, September 19, 2024

धक्कादायक | MPSC च्या विद्यार्थ्यांचा CORONA मुळे मृत्यू

Live Janmat

वैभवचे अधिकारी होण्याचे स्वप्न कोरोनामुळे स्वप्नच बनून गेले…

मूळचा श्रींगोद्याचा रहिवासी असलेला वैभव शितोळे हा युवक पुण्यामध्ये mpsc ची तयारी करत होता. कोरोनामुळे वैभव चा मृत्यू झाला आहे. यामुळे सदाशिव पेठेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वैभवच्या मृत्यूमुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्वांनाच धक्का बसला. काळ वाईट आहे हे नक्की corona खूप जास्त संख्येने वाढत आहे तेव्हा आपण आपली काळजी घ्या. स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने वैभवला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार त्याला पोलीस अधिकारी व्हायचे होते त्याचे स्वप्न अधुरेच राहिले.
“आम्ही वैभवच्या कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात सामील आहोत.”
“वैभव यार तू हरलास” अश्या प्रतिक्रिया त्याच्या मित्रांनी दिलेल्या आहे.

वाढता कोरोना आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षा

अभ्यासाचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये mpsc ची तयारी करण्यासाठी विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर राहायला येत असतात. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुण्यात कडक निर्बंध लावले आहेत. त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. 11 तारखेला संयुक्त पूर्व परीक्षा होत आहे. यासाठी सरकाने काही नियोजन केलेले आहे का असा सवाल विद्यार्थ्यामधून येत आहे.वैभवच्या मृत्यूनंतर विद्यार्थ्यांच्या मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे आता परीक्षा पुढे ढकला अशी काही विद्यार्थी मागणी करू लागले आहेत. तर काही विद्यार्थ्यांचे म्हणणे असे आहे की अजून कितीवेळा परीक्षा पुढे ढकलणार आहे. वाढत्या वयामुळे काही विद्यार्थ्यांनी ही शेवटची संधी आहे असं समजून परीक्षा देत आहेत.

MPSC आणि वास्तव
लाखो विद्यार्थ्यांनी अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिलेलं आहे पण या कोरोनाच्या महामारीमध्ये त्या विद्यार्थ्यांना फटका बसत आहे. बेरोजगारी वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य आता शासनाच्या धोरणावरच अवलंबून असेल.

आम्हाला आमचा जीव महत्त्वाचा आहे

वैभवच्या मृत्यूनंतर mpsc च्या विद्यार्थ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. लॉकडाऊन कधीही लागेल लागू शकेल. त्यामुळे 11 तारखेला होणाऱ्या परीक्षेच काय? सध्याच वातावरण पाहता परीक्षा पुढे ढकलावी. कारण आम्हाला आमचा जीव महत्त्वाचा आहे. अशी विद्यार्थ्यांमधून मागणी होऊ लागली आहे.

सारथी संस्थेचे 52 विद्यार्थी UPSC ची Mains परीक्षा उत्तीर्ण

Live Janmat

सारथी संस्थेमार्फत मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी समाजातील 233 विद्यार्थ्यांनी UPSC ची मुख्य परीक्षा जानेवारी 2021 मध्ये दिली. या परीक्षेचा निकाल 23 मार्च 2021 रोजी घोषित करण्यात आला आहे.

या परीक्षेत सारथी संस्थेचे 52 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन.

हे 52 विद्यार्थी पुणे, अहमदनगर, बुलढाणा, सातारा, सांगली, अमरावती, जळगाव, सोलापूर, नागपूर, नाशिक, परभणी, लातूर, रत्नागिरी, ठाणे, वाशीम, नांदेड, यवतमाळ, गोंदिया, जालना, हिंगोली व धुळे जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

UPSC च्या मुलाखती ( Interview) एप्रिल व मे महिन्यात होतील. यशाच्या शिखरावर जाण्यासाठी हा शेवटचा व सर्वात महत्वाचा टप्पा आहे.

मुलाखत ही दिल्ली येथे असल्याने, सारथी संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांचे Mock Interviews हे IAS, IPS, IRS अधिकारी व विषय तज्ज्ञांमार्फत घेतले जातील.
विद्यार्थ्यांच्या शंकेचे निरसन करण्यासाठी whatsapp ग्रुप तयार करून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शंका समाधान केले जाईल.
दिनांक 27 मार्च ला या 52 विद्यार्थ्यांना zoom meeting द्वारे IAS, IRS, IRPFS अधिकाऱ्यांनी 4 तास मुद्देसूद मार्गदर्शन केले आहे.

या सर्व विद्यार्थ्यांनी UPSC Interview मध्ये भरपूर मार्क मिळवून IAS/IPS/IRS/IFS असे उच्च पदस्थ अधिकारी व्हावेत यासाठी सारथी संस्था प्रयत्नशील आहे. सर्व मराठा/कुणबी संघटना व जनता सुद्धा यासाठी अनेक वर्षांपासून यासाठी प्रयत्नशील आहेत.
पुन्हा एकदा या सर्व यशस्वी 52 विद्यार्थ्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.

सारथी संस्थेचा लाभ हा गोर-गरीब विद्यार्थ्यांना होत आहे. त्यामुळे या संस्थेद्वारे अनेक नवनवीन उपक्रम घेणे गरजेचे आहे. तसेच या संस्थेला भरीव निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.