- Advertisement -
कोल्हापूर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना वाढत चालला आहे. काळजी करणारी बाब म्हणजे मृत्यू दरही वाढत आहे. दररोज उच्यांकी वाढ होत आहे. गेल्या 24 तासात आतापर्यंत सर्वाधिक मृत्यू 41 झाले आहेत. तर 843 जण पोसिटीव्ह आले आहेत.
अर्ध्या तासाला एक मृत्यू
कोल्हापूर जिल्ह्यात आजवरचे सर्वाधिक कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 24 तासात 41 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सरासरी अर्ध्या तासाला एक मृत्यू होत आहे. त्यामुळे कोल्हापूर मध्ये कोरोनाची परिस्थिती गंभीर होत आहे.
जिल्ह्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 7 हजार 749 वर पोहोचली आहे. तर आजपर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या 63 हजार 917 इतकी झाली आहे.