कोणतेही यश हे सहज मिळत नसत, तर त्याच्या पाठीमागे खूप कष्ट घेतलेले असतात. याचच एक उदाहरण काल सोशल मीडियावर पाहाला मिळाले.
काल ओडिशाच्या गंजम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व आयएएस अधिकारी विजय कुलांगे यांनी या तरुणाचा फोटो शेअर केला आहे. मास्क घालून हॉस्पिटलच्या बेडवरच पुस्तक आणि कॅलक्युलेटर वगैरे ठेवून तो अभ्यास करत असल्याचं फोटोमध्ये दिसतंय.
त्यावेळी त्यांनी आपल्या ट्विटरवर हा फोटो शेअर करत रुग्णाचं कौतुक केलं. “यश योगायोगाने मिळत नाही, त्यासाठी समर्पणाची आवश्यकता असते” अशा आशयाचा संदेशही त्यांनी या फोटोसोबत लिहिला.
Success is not coincidence. You need dedication. I visited Covid hospital & found this guy doing study of CA exam. Your dedication makes you forget your pain. After that Success is only formality. pic.twitter.com/vbIqcoAyRH
— Vijay IAS (@Vijaykulange) April 28, 2021