Friday, November 15, 2024

Covid-19 Guidelines; 5 वर्षांखालील मुलांना मास्क लावण्याची गरज नाही

- Advertisement -

कोरोनाबाधित मुलांच्या उपचारासाठी नव्या गाईडलाइन्स जारी करण्यात आल्या आहेत. या गाईडलाइन्समध्ये कोरोनाबाधित लहान मुलांवर उपचार करताना रेमडेसिवीर आणि स्टिरॉईड्सचा वापर न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसंच 5 वर्षांखालील मुलांना मास्क लावण्याची गरज नाही, असं म्हटलं आहे. (Covid-19 Guidelines; Children under the age of 5 do not need to wear a mask)

सौम्य लक्षणांमध्ये ऑक्सिजन पातळी 94 टक्क्यांच्या आसपास असू शकते. याशिवाय घशात खवखव, श्वास घेताना, खोकताना त्रास जाणावणे यांचा समावेश आहे. शिवाय ताप असेल तर पॅरासिटामोल गोळी देताना 4-6 तासांचं अंतर ठेवा. खोकल्यासाठी गरम पाण्याच्या गुळण्या करा. विलगीकरणात गेलेल्या मुलांशी पालकांनी सकारात्मक चर्चा करावी. ऑक्सिजन पातळी तपासण्यासाठी मुलांना 6 मिनिट वॉक टेस्ट करण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.

हे ही वाचा

आरोग्य मंत्रालयाकडून नव्या गाईडलाइन्स ; लहान मुलांना रेमडेसिविर देऊ नका

मुलांना मास्कची आवश्कता नाही

नव्या गाईडलाईन्सनुसार, 5 वर्षांखालील मुलांना मास्क लावणं बंधनकारक नाही. तर 6-11 वर्षाच्या मुलांनी आई-वडिलांच्या देखरेखीखाली मास्क लावू शकतात. तसंच 12 वर्षावरील मुलं मास्क वापरु शकतात.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles