कोल्हापूर जिल्हायातून अदानी जलविद्युत प्रकल्प हद्दपार

कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील पाटगाव धरणावर (Patgaon Dam) उभारण्यात येणारा अदानी हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्प (adani project kolhapur) अखेर रद्द झाला. आमदार प्रकाश आबिटकर यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे केलेले पाठपुरावा आणि अनेक जल आंदोलनाला अखेर यश आले आहे. आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले “भुदरगड तालुक्यातील पाटगाव मध्यम प्रकल्प जीवनदायी आहे. नागरिक व शेतीसाठी महत्त्वाचे आहे कारण या पाण्यावरती भुदरगड तालुक्यातील ११५ हून अधिक गावे व वाडीवस्त्या अवलंबून आहेत. तालुक्यातील सुमारे १२ हजार ७० हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे.”अदानी ग्रुपने प्रकल्प (adani project kolhapur) रद्द केल्याची पत्र दिल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली. अखेर ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश मिळाले असून प्रकल्प रद्द करण्यात आला आहे. 

पाटगाव प्रकल्पाकरिता अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनी अंजिवडे ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग गावाजवळ नवीन धरण बांधण्यात येणार असून धरणामध्ये तळंबा खोऱ्यातील साठविलेले पाणी उचलून पाटगाव मध्यम प्रकल्पामध्ये साठविण्यात येणार असून त्याचा वापर करून २१०० मेगावॉट वीजनिर्मिती होणार होती.

स्थानिक गावकऱ्यांचा विजय | adani project kolhapur

उद्योगपती गौतम अदानींच्या कंपनीच्या हायड्रो इलेक्ट्रिक वीज निर्मिती प्रकल्पाला कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील पाटगाव धरणातील पाणी देण्यास स्थानिकांचा विरोध होता. पाटगाव धरणातील नागरिक व शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी हायड्रो इलेक्ट्रिक वीज निर्मिती प्रकल्पाला देऊ नये अशी अनेकवेळा मागणी करत ग्रामस्थांनी अनेक आंदोलने केले होते. स्थानिकांच्याअनेक जल आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. पाटगाव धरणाच्या पाण्याचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी व शेतीच्या कामासाठी ११५ हून अधिक गावे वापर करतात.

raj mdp  के बारे में
For Feedback - raj.mdp09@gmail.com