kolhapur loksabha Live Updates | मोठ्या मतफरकाने संजय मंडलिक जिंकतील

kolhapur loksabha live updates| कोल्हापुरात आज सकाळपासूनच अनेक मतदान केंद्रांवर मतदानासाठी रांगा लागल्या आहेत. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये कोल्हापूरात सहा विधानसभा मतदारसंघांपैकी सकाळच्या पहिल्या दोन तासांमध्ये सर्वाधिक मतदान कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर आणि करवीर या तीन मतदारसंघांमध्ये झाले आहे. 

कोल्हापूर मधील सर्व दिग्गज नेते मंडळींनी सकाळच्या सत्रात मतदान केले यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.हसन मुश्रीफ यांनीही मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना कोल्हापूर मधील दोन्ही जागा महायुती मोठ्या मतफरकाने जिंकतील असा विश्वास व्यक्त केला. kolhapur loksabha live updates

LokSabha Election 2024 Live Updates आत्तापर्यंत कोल्हापूर लोकसभेत सर्वाधिक मतदान; जाणून घ्या संपूर्ण आकडेवारी

गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा दणका चांगलाच वाढल्याने त्याचा विपरीत परिणाम मतदानावर होत आहे. यासाठी 12 वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान करून घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून प्रयत्न सुरू आहेत.

 कोल्हापुरात थेट लढत संजय मंडलिक आणि शाहू छत्रपती महाराज यांच्यामध्येच आहे. तर हातकणंगले मध्ये तिरंगी लढत आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांमध्ये काय होणार याकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष आहे. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर आणि हातकणंगलेच्या जागेवर कमालीचं लक्ष केंद्रित केलं आहे.

थेट लढत संजय मंडलिक आणि शाहू छत्रपती महाराज यांच्यामध्येच आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांमध्ये काय होणार याकडे लक्ष आहे. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर आणि हातकणंलगेच्या जागेवर कमालीचं लक्ष केंद्रित केलं आहे.

[webinsights_author_box]