धनंजय महाडिक युवाशक्तीच्या पुनर्बांधणीसाठी कृष्णराज महाडिक यांचा दौरा

धनंजय महाडिक युवाशक्तीचे नेते आणि युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी युवाशक्तीची पुनर्बांधणी करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याचा दौरा सुरू केलाय. विविध गावातील नागरिकांच्या समस्या जाणून घेवून, त्याची सोडवणूक करण्यासाठी कृष्णराज यांनी जनसंपर्क मोहिम सुरू केलीय. प्रारंभी त्यांनी चंदगड तालुक्यातील विविध गावांना भेटी दिल्या. या माध्यमातून युवा पिढीसह ग्रामस्थांशी संवाद साधत, त्यांनी समाजाच्या अपेक्षा समजून घेतल्या.

खासदार धनंजय महाडिक यांनी २००५ मध्ये संघटीत युवाशक्तीची स्थापना केली. त्यातून युवा वर्गाला सकारात्मक उपक्रमात सामिल करून घेतलं. त्यांचीच प्रेरणा घेवून, युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी आता धनंजय महाडिक युवाशक्तीची जबाबदारी स्वीकारलीय. एक प्रसिध्द रेसर आणि युटयुब ब्लॉगर अशी ओळख असलेल्या कृष्णराज महाडिक यांनी गेल्या ४-५ वर्षात सामाजिक भावनेतून अनेकांना मदत केली. आता कृष्णराज महाडिक यांनी धनंजय महाडिक युवा शक्तीच्या पुनर्बांधणीसाठी कोल्हापूर जिल्हयाचा दौरा सुरू केलाय. प्रत्येक गावातील शेतकरी, उद्योजक, तरूण, तरूणी यांची भेट घेवून त्यांच्या अपेक्षा ते समजावून घेत आहेत. तसंच ग्रामीण भागातील, अडीअडचणी समजून घेवून, कोणती विकासकामं प्रलंबित आहेत, याचाही आढावा घेतला जातोय. नुकताच त्यांनी चंदगड तालुक्यातील विविध गावांचा दौरा केला. खासदार धनंजय महाडिक यांच्या निधीतून मलतवाडी गावासाठी मंजूर झालेल्या ५ लाख रुपयांचे काँक्रीट रस्ते, २८ लाखाचे पाणंद रस्ते, १७ लाखाच्या जिमचा स्लॅब अशा विकासकामांचं उद्घाटन कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते झालं. तर कोवाड इथल्या स्वामी इंग्लिश मीडियम स्कूलला त्यांनी सदिच्छा भेट दिली. इथली दोन मुलं शैक्षणिकदृष्टया दत्तक घेतली. शिवाय चंदगड तालुक्यातील दुंडगे, चिंचणी इथल्या युवाशक्ती शाखेचं उद्घाटन केलं.

यावेळी महेश बागडी, विशाल तलवार, सागर चिंचणीकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. तर राजगोळी खुर्द आणि राजगोळी बुद्रुक इथंही त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. राजगोळी खुर्द इथं विकासकामांसाठी १७ कोटी निधी मंजूर केलाय. तर राजगोळी बुद्रुक गावातील दत्त हायस्कूलला भेट देऊन, थेट विद्यार्थ्यांसोबत त्यांनी विविध खेळाचा आनंद घेतला. दिंडेलकोप आणि तळगोळी ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचांसोबत चर्चा करून त्यांनी गावच्या समस्या जाणून घेतल्या. कृष्णराज महाडिक यांनी चंदगड तालुक्यातील सर्व स्तरातून नागरिकांशी संवाद साधून, नव्या जुन्या पिढीला आश्वस्त केलं.

vishal  के बारे में
vishal The live janmat is a Marathi digital News web portal. We aim to report the latest news, views, and entertainment. We seek to look at policies and decision-making from the perspective of people. Read More
For Feedback - livejanmt@gmail.com