मुंबई, दि. 11 : राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील तासिका तत्त्वावर(CHB) कार्यरत असलेल्या अध्यापकांचे मानधन दिवाळीपूर्वीच करावे, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
राज्यातील तासिका तत्वावर कार्यरत असलेल्या अध्यापकांचे मानधन वेळेत देणे आवश्यक आहे. परंतु काही महाविद्यालय त्यांचे मानधन वेळेत देत नाहीत अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारीची तातडीने दखल घेऊन दिवाळीपूर्वी दि. २१ ऑक्टोबर २०२२ पर्यत त्यांच्या थकित मानधन देण्यात यावे. याबाबत संबंधित उच्च व तंत्रशिक्षण विभागीय सह संचालक यांनी आढावा घेऊन अध्यापकांचे मानधन दिवाळीपूर्वी मिळेल याकडे लक्ष द्यावे, असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.
- फडणवीसांचा शब्द न ऐकणं भोवलं! प्रशांत परिचारकांचा पत्ता कट, सोलापुरातून राजेंद्र राऊतांना विधानपरिषदेची उमेदवारी
- महिला दिनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडूनविद्यार्थिनींचे औक्षण करून स्त्रीशक्तीचा अनोखा सन्मान
- महापालिका निवडणूक महायुती एकत्रच लढणार, जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ राहणार, खासदार धनंजय महाडिक यांचा विश्वास





