Saturday, April 1, 2023
No menu items!
Homeशिक्षणपोलीस उपनिरीक्षक पदसंख्येत वाढ करावी- समन्वयक समितीची मागणी

पोलीस उपनिरीक्षक पदसंख्येत वाढ करावी- समन्वयक समितीची मागणी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब (अराजपत्रित) पूर्व परीक्षा २०२२ ही जुन्या अभ्यासक्रमाने होणारी शेवटची परीक्षा आहे. २०२० व २०२१ या मागील २ वर्षात कोरोनामुळे PSI(EXAM of PSI) परीक्षासाठी वयानुसार शेवटची संधी आहे, असे हजारो विद्यार्थी ग्रामीण भागातून पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न घेऊन तयारी करत आहेत. ही स्पर्धा परीक्षेची(EXAM of PSI) तयारी करणार्‍या मुलांसाठी शेवटची संधी असल्याने २०२२ परीक्षेद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये रिक्त असलेली पदे भरण्यात यावी. यामुळे PSI ६०३ पदांची संख्या १००० प्लस होईल. सुमारे ६०० PSI ते API प्रमोशन या महिन्यात होणार आहे. सदर प्रमोशमन गृहमंत्रींनी लवकर केले तर या रिक्त जागा 24/12/2022 रोजी होणाऱ्या मुख्य परीक्षेसाठी समाविष्ट करता येतील. ही रिक्त होणारी PSI पदे २०२२ मुख्य परीक्षेमध्ये सामाविष्ट केल्यास महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थी यांना याचा फायदा घेता येईल. असे मत स्पर्धा परीक्षा समन्वयक समिती, महाराष्ट्र निवेदनाद्वारे राहुल कवठेकर, नीलेश गायकवाड, महेश घरबुडे, विश्वंभर भोपळे यांनी व्यक्त केले. यावर गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी लवकर तोडगा काढावा अशी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थी यांच्याकडून मागणी होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular