Saturday, July 27, 2024

kolhapur loksabha | कोल्हापूरकर महाराजांना राजकीय समर्थन देणार का ?

- Advertisement -

kolhapur loksabha | कोल्हापूरात सध्या लोकसभेच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरू लागल्या आहेत. महा विकास आघाडीकडुन छत्रपती शाहू महाराज यांना संधी देण्यात येणार आहे. मात्र कोणत्या पक्षामार्फत निवडणूक लढवणार हे अद्यापही स्पष्ट झालेल नाही. महायुतीकडून अद्यापही उमेदवार फिक्स झालेला नाही.

कोल्हापूरच्या राजघराण्याला मोठा मानसन्मान आहे. यापूर्वी छत्रपती मालोजीराजे यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवत विधानसभा गाठली होती. तर आताच्या स्वराज पक्षाचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती यांना राष्ट्रपती कोट्यातून भारतीय जनता पक्षाने खासदारकी बहाल केली होती. पण २००९ साली संभाजीराजे यांना (kolhapur loksabha) कोल्हापूरच्या जनतेने ४४८०० मतांनी पराभव केले होते. कोल्हापूरची जनता प्रत्येक निवडणुकीत ट्रेंड सेट करत असते. सध्या कोल्हापूरच्या जनतेला विकासकामे करणारे नेतृत्व हवे आहे. खराब रस्ते, पाणी टंचाई, महापूर, हद्दवाढ, बेरोजगारी अश्या अनेक समस्यांचा सामना जनतेला करावा लागत आहे.

उद्धव ठाकरे मोदींना संपर्क करण्याच्या प्रयत्नात ; भाजप सोबत पुन्हा मैत्री करणार ?

छत्रपती शाहू महाराजांना नेमक काय साधायच आहे | kolhapur loksabha

राजे घराने म्हणून छत्रपती शाहू महाराज यांना मानाचा सन्मान कोल्हापूरची जनता देते. पण जेंव्हा राजकारणी म्हणून ते समोर येतील तेंव्हा लोकांची मानसिकता कशी असेल हे सांगता येणार नाही. कारण सध्या तरी सहानभूतीचे राजकारण कोल्हापूर मध्ये होताना दिसत नाही. छत्रपती शाहू महाराजांचा विचार केला तर पहिला मतदारसंघाचा आढावा, मतदारसंघातील प्रश्न, जनतेशी थेट संपर्क अश्या अनेक गोष्टींचा प्रश्न पडतो. राजकारणी म्हणून कोल्हापूरकर राजेंना स्वीकारतील का? हे येणारी वेळच ठरवेल. kolhapur loksabha

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles