Saturday, July 27, 2024

महानगरपालिका, नगरपरिषदेत ४० हजार पदांवर मेगा भरती | megabharti

- Advertisement -

राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये तब्बल ४० हजार पदांची megabharti भरती करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी महापालिका आयुक्त, मुख्याधिकाऱ्यांच्या परिषदेत केली. ही भरती प्रक्रिया कार्यवाही तातडीने सुरु करण्याचे निर्देशही शिंदे यांनी या बैठकीत दिले. दरम्यान, सर्व नागरी स्वराज्य संस्थांनी शाळा आणि आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यावर विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

Police Bharti| बारावी पास असाल तर मोफत प्रशिक्षण

Common Entrance Test| MHT CET परीक्षांचे वेळापत्रक जारी

यावेळी राज्यातील सर्व महानगरपालिका आणि ‘अ’ वर्ग नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांची परिषद आज सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आली होती, यावेळी एकनाथ शिंदे यांनी महापालिका, नगरपालिकांमधील पदभरतीची माहिती दिली.राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषद-पंचायतीमध्ये ५५ हजारपेक्षा अधिक पदे रिक्त असून त्यातील राज्यस्तरीय संवर्ग आणि संबंधित नागरी संस्थांमधील ४० हजार विविध पदांची भरती प्रक्रिया लवकर सुरु करण्याच्या सूचना शिंदे यांनी बैठकीत दिल्या.vmegabharti

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील सर्व महानगरपालिका, नगर परिषदा आणि पंचायतींमध्ये ५५ हजारांहून अधिक पदे रिक्त आहेत. यापैकी राज्यस्तरीय आणि संबंधित नागरी संस्थांमध्ये 40 हजार विविध पदांसाठी लवकरच भरती प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. राज्य श्रेणीतील एकूण 1983 पदे आणि नगर परिषद-नगर पंचायत स्तरावर गट अ आणि गट ड मधील 3720 पदांची भरती केली जाणार आहे. ही प्रक्रिया ३४ जिल्ह्यांतील जिल्हा दंडाधिकार्‍यांच्या देखरेखीखाली भरती समितीमार्फत केली जाणार आहे. megabharti

तसेच मुंबई महानगरपालिकेतील ८ हजार ४९० पदांची भरती प्रक्रिया सुरु केली असून या सर्व भरती प्रक्रियांची कार्यवाही सुरु करुन मे अखेर संपूर्ण भरती पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. महानगरपालिकांमधील रिक्त पदांचा आढावा घेऊन सर्व सेवाविषयक बाबी पूर्ण करुन भरती प्रक्रिया युद्धपातळीवर सुरु करण्याच्या सूचनाही शिंदे यांनी दिल्या.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles